‘पॉप्युलर सायन्स रायटिंग’ यावरचा वेबिनार भारतासह सीमेपलीकडेही पोहोचला

pib
रविवार, 26 जुलै 2020

एनसीएसटीसीचे प्रमुख, डॉ मनोज पटारीया आणि विज्ञान प्रसार चे संशोधक डॉबी के त्यागी यांनी श्रोत्यांना संबोधित केले आणि महत्वाची माहिती दिली. या वेबिनारला भारतातून आणि परदेशातून 1282 जणांनी नोंदणी करत मोठा प्रतिसाद दिला आहे.

नवी दिल्ली, 

विज्ञान आणि तंत्रज्ञान  संवाद राष्ट्रीय परिषद आणि विज्ञान प्रसार या     विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या स्वायत्त संस्थेने, विज्ञान कम्युनिकेटर्सची फळी निर्माण करण्यासाठी  एडब्ल्यूएसएआर कार्यक्रमा अंतर्गत संशोधन प्रतिभावंतांच्या क्षमता वृद्धीसाठी  ‘पॉप्युलर सायन्स रायटिंग’ या संदर्भात या आठवड्यात दोन वेबिनार आयोजित केले होते. 

28 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातले तसेच अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, इस्रायल सह 12 देशातले प्रतिभावंत यात सहभागी झाले. विज्ञाना संदर्भात देवाण-घेवाणीचे महत्व, संशोधनातून लोकप्रिय लेख लिहिणे आणि पॉप्युलर सायन्स रायटिंग’ संदर्भातले तंत्र आणि उपयुक्त माहिती यावेळी देण्यात आली.

एनसीएसटीसीचे प्रमुख, डॉ मनोज पटारीया आणि विज्ञान प्रसार चे संशोधक डॉबी के त्यागी यांनी श्रोत्यांना संबोधित केले आणि महत्वाची माहिती दिली. या वेबिनारला भारतातून आणि परदेशातून 1282 जणांनी नोंदणी करत मोठा प्रतिसाद दिला आहे.

माझे संशोधन मी समाजातल्या सर्व वयोगटातल्या आणि सर्व शैक्षणिक पार्श्वभूमीच्या लोकांना समजेल आणि त्यांना उत्सुकता वाटेल अशा पद्धतीने समजावू शकलो तर त्या समस्येच्या विविध मिती मला समजल्या आहेत असे मी म्हणेन असे डी एसटी सचिव    प्रा.आशुतोष शर्मा यांनी सांगितले.

संबंधित बातम्या