पृ्थ्वीवर लॉकडाउन म्हणून आकाशात लावलं लग्न

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 मे 2021

का जोडप्याने तर कमालच केली लग्नाच्या दरम्यान लॉकडाउन आल्याने वेगळाच पर्याय शोधून काढला. कोरोनाच्या निर्बंधांचा विचार करता एका जोडप्याने पृथ्वी सोडली आणि आकाशातच लग्न केले. 

मदुराई: संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा(corona second wave) सामना करत आहे. कोविड -19 विरुद्धचा लढा अखंडपणे सुरूच आहे. त्याचबरोबर देशातील बर्‍याच राज्यामध्ये लॉकडाऊन आहे,  त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. लोकांची सर्व महत्त्वाची कामं धंदे अडकून पडली आहेत, मग तो व्यवसाय असो, नोकरी असो किंवा विवाहसोहळे. पण एका जोडप्याने तर कमालच केली लग्नाच्या दरम्यान लॉकडाउन आल्याने वेगळाच पर्याय शोधून काढला. कोरोनाच्या निर्बंधांचा विचार करता एका जोडप्याने पृथ्वी सोडली आणि आकाशातच लग्न केले. 

अनेक वर्ष राहील कोरोना लसीचा प्रभाव; बूस्टर डोसने वाढवता येतील अँटीबॉडी  

तमिळनाडूच्या मदुराई येथे हे एक अनोखा लग्नसोहळा पार पडला. नातेवाईकांसह विमानात लग्न सोहळा पार पाडला. तामिळनाडूत वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर सीएम स्टालिन यांनी 24 ते 31 मे दरम्यान 7 दिवस राज्यात संपूर्ण कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. मदुराई येथील रहिवासी असलेले राकेश आणि दीक्षा यांचे चार्टर्ड विमानात लग्न झाले. त्यांनी एक विमान भाड्याने घेतले आणि 130 नातेवाईकांसह आकाशात लग्न केले. दोन दिवसांपूर्वी हे लग्न झाले. राज्यात एक दिवसाची सूट जाहीर होताच त्यांनी त्यांचे लग्न करून घेण्याची योजना आखली. 

परीक्षा रद्द होणार नाहीत; 1 जूनला होणार CBSE आणि ICSE बोर्ड परीक्षांच्या तारखांची घोषणा 

 

सर्व 130 प्रवासी त्यांचे नातेवाईक असून सर्वांनी आरटी-पीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल सादर केला होता. त्यानंतरच ते विमानात बसले होते. आणि कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच हा लग्नसोहळा पार पडल्याचा दावा या नवविवाहित दाम्पत्याने केला आहे. मात्र व्हिडिओमध्ये बघितलं तर कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडालेला दिसत आहे. लग्नात उपस्थित पाहूण्यांना मास्क चा आणि सोशल डिस्टेंसिंगचा विसर पडलेला दिसत आहे.

संबंधित बातम्या