कोरोनामुळे गंभीर परिस्थिती झालेल्या 11 राज्यांची यादी; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

कोरोनामुळे गंभीर परिस्थिती झालेल्या 11 राज्यांची यादी; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता
harsh vardhan.jpg

देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात असल्याने पुन्हा मागील वर्षी प्रमाणे परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. या सगळ्या परिस्थितीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोनाच्या या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. लग्न, स्थानिक निवडणुका आणि शेतकरी आंदोलन या गोष्टी देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांचे सर्वात मोठे कारण असल्याचे  केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले आहे. (Weddings, elections and the Farmer Protest are responsible for the growing cases of corona)

देशातील 11 राज्यांत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते आहे.  केंद्र सरकारने कोरोनाची परिस्थिती बिकट होत चाललेल्या अशा 11 राज्यांची स्वतंत्र्य यादी तयार केली आहे. महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचा या यादीमध्ये समावेश असल्याचे समजते आहे. देशभरता सर्वात जास्त चिंताजनक परिस्थिती या 11राज्यांत असल्याने या राज्यांत कोरोनामुळे होणारे मृत्यू देखील अधिक असल्याचे समोर आले आहे. “गेल्या दोन आठवड्यांमध्ये या 11राज्यांत दररोजच्या कोरोना रुग्णवाढीच्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या सर्वाधिक असून, देशातील एकूण परिस्थिती पैकी 54 टक्के परिस्थितीला देशातील ही 11 राज्यच जबाबदार आहेत आणि कोरोनामुळे होणारे  65 टक्के मृत्यू देखील याच राज्यांमध्ये होत असल्याचे, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले.  देशातील वेगवगेळ्या राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स दरम्यान झालेल्या बैठकीत त्यांनी या मुद्द्यांवर चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि पंजाब मधील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सुद्धा त्यांनी  यावेळी सांगितले आहे. 

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी (Health Minister) राज्यातील कोरोना चाचण्यांच्या (Covid Test) संख्येत वाढ झाल्याचे कौतुक केले परंतु गुजरात, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र (Maharashtra) यांसारख्या राज्यांमध्ये वाढत्या अँटिजन  चाचण्यांच्या बद्दल खबरदारी देखील बाळगण्यास सांगितली आहे. तसेच डॉ. हर्ष वर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी राज्यांना कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com