Corona second wave: दिल्लीत विकेंड कर्फ्यू लागू

arvind kejariwal
arvind kejariwal

दिल्लीमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही निर्बंद्घ लावले आहेत. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी रात्री 10 ते सायंकाळी 6 या वेळेत दिल्लीत कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत मॉल, जिम आणि स्पा बंद राहतील, असे केजरीवाल यांनी सांगितले. रेस्टॉरंटमध्ये फक्त होम डिलिव्हरी असेल तर सिनेमा हॉल 30 टक्के क्षमतेसह चालतील. दिल्लीत हॉस्पिटलच्या बेडची कमतरता नाही, पाच हजारापेक्षा अधिक बेड रिकामे आहेत. आमचे प्राधान्य म्हणजे आजारी असलेल्यांना कुठल्याही रुग्णालयात उपचार द्यावेत अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. (Weekend curfew imposed in Delhi)


अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
- दिल्लीत कोरोनाची रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहेत. दिल्लीत कठोरता आवश्यक आहे.
- दिल्लीत हॉस्पिटलच्या बेडची कमतरता नाही, पाच हजाराहून अधिक बेड रिक्त आहेत.
- आमची प्राथमिकता अशी आहे  आजारी असलेल्या व्यक्तीला कुठल्याही रुग्णालयात उपचार     मिळावेत. 
- आठवड्याच्या शेवटी कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री 10 ते सोमवारी     सकाळी 6 वाजेपर्यंत असेल.
- दिल्लीत मॉल, जिम आणि स्पा बंद राहतील. रेस्टॉरंटमध्ये फक्त होम डिलिव्हरी असेल तर     सिनेमा हॉल 30 टक्के क्षमतेसह चालतील.
- बरेच लोक बिना मास्कचे फिरत आहेत असे घडू नये. 
- आम्ही देखील काळजी घेत आहोत बाजारात गर्दी होऊ नये, आम्ही आपल्या सुरक्षिततेसाठी     तयार  आहोत, आठवड्यात बाजारपेठा उघडतील पण  निर्बंधासह.
- कर्फ्यू लादला गेला आहे, परंतु अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही. 
- ज्यांचे विवाह आहेत, त्यांना कर्फ्यू पास देण्यात येईल
- बाजारपेठांमध्ये मास्क आणि सामाजिक अंतर आवश्यक आहे, साप्ताहिक बाजारपेठा     एकदिवसआड उघडतील.

तुमच्या हितासाठी हे निर्बंध लादले जात आहेत. त्याच कारण म्हणजे कोरोना रुग्णाची साखळी तोडणे फार महत्वाचे आहे असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.
महत्त्वाचे म्हणजे बुधवारी दिल्लीत कोराणाचे 17,282 नवीन रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत एकाच दिवसात कोरोनाची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. बुधवारपासून कोरोनामुळे दिल्लीत 100 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com