पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक : चौथ्या टप्प्यातील 22 टक्के उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल  

दैनिक गोमंतक
सोमवार, 5 एप्रिल 2021

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत येत्या १० एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या चौथ्या टप्प्यात एकूण 373 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तथापि, या टप्प्यात होणाऱ्या मतदानातील उमेदवारांविषयी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत येत्या १० एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या चौथ्या टप्प्यात एकूण 373 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तथापि, या टप्प्यात होणाऱ्या मतदानातील उमेदवारांविषयी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. वेस्ट बंगाल इलेक्शन वॉच अँड असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या वतीने एक  अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 22 टक्के म्हणजे 142 उमेदवारांवर फौजदारी खटले दाखल करण्यात आलेले आहेत. यातील 81 उमेदवारांवर सामान्य स्वरूपाचे तर 61 उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात भाजपाच्या उमेदवारांवर सर्वाधिक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. 

Chattisgarh Naxal Attack: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घटनास्थळी भेट देणार;...
 
या गुन्ह्यांमध्ये पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त दंड, अजामीनपात्र गुन्हे, निवडणूक संबंधित गुन्हे, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान संबंधित गुन्हे, प्राणघातक हल्ला, खून, अपहरण, बलात्कार संबंधित गुन्हे आणि महिलांशी संबंधित गुन्हे इत्यादींचा समावेश आहे. एडीआर ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, 10 एप्रिल रोजी होणार्‍या चौथ्या टप्प्यात सर्वाधिक कलंकित उमेदवार भाजपचे आहेत. भाजपच्या 44 पैकी22 उमेदवार म्हणजेच 61 टक्के लोकांनी आपापल्या गुन्हेगारी प्रकरणांचा तपशील दिला आहे, तर माकपने फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या अशा २२  पैकी १६  उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, टीएमसीच्या 44 पैकी 17 उमेदवार.  कॉंग्रेसच्या 9 पैकी 2 उमेदवार कलंकित प्रतिमेचे आहेत. गंभीर गुन्ह्यांविषयी बोलयचे झाल्यास भाजपचे 24, माकपचे 10, टीएमसीचे 17 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. 19 उमेदवारांनी महिलांवरील खटल्यांमध्ये आपला सहभाग जाहीर केला आहे. तर चौघांनी खून आणि 16 प्रकरणांत स्वतःविरूद्ध चालू असलेल्या खटल्यांविषयी माहिती दिली आहे.

देशात कोरोनाच्या उद्रेकाने परिस्थिती चिंताजनक; महाराष्ट्रात मृतांचा उच्चांक

दरम्यान,पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार थांबला असून भाजप आणि सत्ताधारी पक्षा टीएमसीने आता चौथ्या टप्प्यासाठी प्रचार सुरू केला आहे. 10 एप्रिल रोजी कोलकाता, हावडा आणि आसपासच्या भागात मतदान होत आहे. सोमवारी कोलकताच्या टॉलीगंज भागात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा एक रोड शो घेणार आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत. त्याशिवाय त्यांची जाहीर सभाही श्रीरामपूर स्टेडियम आणि हुगळीच्या चुंचुरा मैदानावर होणार आहे. 

पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी तिसर्‍या टप्प्यात 31 विधानसभा मतदारसंघात निवडणुका होणार आहेत.मतदानासंदर्भात निवडणूक आयोगाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. 6  एप्रिल रोजी दक्षिण बंगालच्या तीन जिल्ह्यांमध्ये सकाळी 7  ते सायंकाळी 6.30 या कालावधीत मतदान होईल. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात 16 जागा, हावडामध्ये 7 आणि हुगळी जिल्ह्यात 8 जागा आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे 205 उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तर एकूण मतदान केंद्रांची संख्या 10871 आहे. 

संबंधित बातम्या