Video: मिथुन चक्रवर्तींचा मोठा दावा, 'TMC चे 38 आमदार भाजपच्या संपर्कात'

TMC Vs BJP: पश्चिम बंगालचे भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी बुधवारी धक्कादायक दावा केला आहे.
Mithun Chakraborty
Mithun ChakrabortyDainik Gomantak

West Bengal BJP leader Mithun Chakraborty: पश्चिम बंगालचे भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी बुधवारी धक्कादायक दावा केला आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, 'टीएमसीचे 38 आमदार आमच्या संपर्कात आहेत.' मी स्वतः 21 आमदारांशी चर्चा करत असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, बुधवारी कोलकाता (Kolkata) येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मिथुन यांनी हा दावा केला. त्यांनी पत्रकारांना विचारले की, तुम्हाला ब्रेकिंग न्यूज हवी आहे का? माझ्याकडे 38 टीएमसी (TMC) आमदार आमच्या संपर्कात असल्याची ब्रेकिंग न्यूज आहे, त्यापैकी मी स्वतः 21 आमदारांशी चर्चा करत आहे.

Mithun Chakraborty
1 वर्षानंतर मिथुन चक्रवर्ती राजकारणात पुन्हा सक्रिय, केलं हे आवाहन

महाराष्ट्रात सत्ता बदलू शकते, मग बंगालमध्ये का नाही?

मीडियाशी बोलताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले, 'मी तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज देत आहे. तृणमूलचे 38 आमदार भाजपच्या (BJP) संपर्कात आहेत. त्यापैकी 21 जण माझ्या थेट संपर्कात आहेत. तथापि, मिथुन यांचा दावा खरा मानला तरी, 38 टीएमसी आमदार भाजपमध्ये सामील होऊनही सरकार स्थापन होऊ शकत नाही. राज्यात भाजपचे सध्या 69 आमदार असून आणखी 38 आमदार मिळाल्यानंतर हा आकडा 107 होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com