भवानीपूरमध्ये 'खेला होबे', ममता बॅनर्जींचा दणदणीत विजय

भवानीपूर (Bhavanipur) मधून अखेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee यांचा विजय झाला आहे.
 भवानीपूरमध्ये 'खेला होबे', ममता बॅनर्जींचा दणदणीत विजय
West Bengal By polls Chief Minister Mamata Banerjee won the electionDainik Gomantak

पश्चिम बंगालची (West Bengal By polls) हाय प्रोफाइल सीट भवानीपूर (Bhavanipur) मधून अखेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee यांचा विजय झाला आहे. या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या (BJP) प्रियंका तिब्रेवाल (Priyanka Tibrewal) यांचा 58000 मतांनी पराभव केला आहे . भाजपच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल यांनी त्यांचा पराभव स्वीकारला असून ममतांना त्यांच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. (West Bengal By polls Chief Minister Mamata Banerjee won the election)

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा मतदारसंघात विक्रमी 58,832 मतांनी विजय मिळवला आहे. भवानीपूर विधानसभा मतदारसंघात ममतांच्या विजयाची ही हॅटट्रिक आहे. बंगालच्या हायप्रोफाईल भवानीपूर जागेसाठी मतांच्या मतमोजणीत या जागेवरून निवडणूक लढवणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या प्रियंका तिब्रेवाल यांचा पराभव केला आहे.

भवानीपुर विधानसभा मतदार संघांत ममता दीदींची ही हॅट्रिक आहे. 2011 मध्ये त्यांनी ही जागा 54,213 मतांच्या फरकाने जिंकली होती तर,2016 च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींनी भवानीपूरची जागा 25,301 मतांनी जिंकली होती.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com