"अमित भाई, आप पहले दिल्ली संभालो फिर बंगाल का देखेंगे"

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 28 जानेवारी 2021

"दिल्लीतील परिस्थिती पोलिस हाताळू शकले नाही. जर असेच बंगालमध्ये झाले असते तर अमित भैय्याने, "काय झाले? याचा आम्ही तीव्र निषेध करतो." असे म्हटले असते. असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अमित शाहा यांच्यावरही टीका केली आहे. 

कोलकता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही कृषी कायद्याबाबत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. "आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि हे तीनही कृषी कायदे मागे घ्यायला पाहिजे," असे त्यांनी म्हटले आहे. ममता सरकारने कृषी कायद्याचा निषेध करण्यासाठी आणि हे कायदे रद्द करण्यासाठी विधानसभेचे दोन दिवसीय विशेष सत्र बोलावले आहे. या कायद्यांविरोधात येथे प्रस्ताव ठेवण्यात आला. ममता यांनी कृषी कायदे आणि दिल्लीतील आंदोलन आणि  हिंसाचाराबद्दल मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

कृषी कायद्याविरोधात विधानसभेत सादर केलेल्या प्रस्तावातील चर्चेदरम्यान ममता म्हणाल्या की, "दिल्लीतील परिस्थिती पोलिस हाताळू शकले नाही. जर असेच बंगालमध्ये झाले असते तर अमित भैय्याने, "काय झाले? याचा आम्ही तीव्र निषेध करतो." असे म्हटले असते. असे म्हणत त्यांनी अमित शाहा यांच्यावरही टीका केली आहे. तुम्ही एकतर कायदा मागे घ्या किंवा खुर्ची सोडा,"असे ममता यांनी म्हटले आहे.

CBSE दहावी - बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर होणार -

ममता पुढे म्हणाल्या की, "आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि हे कायदे मागे घ्यावेत अशी आमची इच्छा आहे. हे कायदे जबरदस्तीने पारित केले गेले आहेत. मोदी सरकारने दिल्लीतील हिंसाचार अत्यंत वाईट पद्धतीने हाताळला, तेथे घडलेल्या घटनांसाठी पूर्णपणे भाजपाच जबाबदार आहे. "तेव्हा तूम्ही आधी दिल्ली सांभाळा, त्यानंतर बंगालचा विचार करा," असे वक्तव्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

आम आदमी पक्षाच्या बैठकीत अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा -

दरम्यान काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनीही दिल्ली आणि तेथे घडलेल्या हिंसाचारासाठी भाजप आणि अमित शाहा यांना जबाबदार ठरवले होते. ते म्हणाले की लाल किल्ल्यावर चढून निदर्शने करणारे भाजपचे एजंट होते. याला अमित शाहा जबाबदार आहेत, त्यामुळे कॉंग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घटनेस प्रकाश जावडेकर यांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष जबाबदार आहे असे म्हटले असता, चिदंबरम यांनी, 'मिस-इंफोरमेशन एंड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर’ यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.' असे प्रतिउत्तर दिले होते.

संबंधित बातम्या