बंगालच्या निवडणुकीची चिंता दूर सारत ममता दीदींनी धरला पारंपरिक नृत्याचा ठेका

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना लक्ष करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये.

अलीपुरद्वार : “बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालला प्रत्येक क्षेत्रात मागे नेले आहे, त्यामुळे राज्यातील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही”, असं वक्तव्य नुकतंच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी हावडा येथील भाजपाच्या मेळाव्यात केलं होतं. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना लक्ष करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये. परंतु, याचा काहीही परिणाम ममता बॅनर्जींवर होताना दिसत नाहीये. त्या जणू आपल्या विजयाबद्दल निश्चिंत आहेत.

शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला

याचाच प्रत्यय आज पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार जिल्ह्यात आला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अलीपुरद्वार जिल्ह्यातील फलकता येथे आयोजित करण्यात आलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होत्या. जिल्ह्यातील फलकता येथे आयोजित करण्यात आलेल्या या सामुहिक विवाह सोहळ्यात पश्चिम बंगालमधील सांस्कृतिक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील पारंपरिक नृत्याचा ठेका धरला. ममता दिदींच्या या कृतीमुळे नृत्य कलाकार भारावून गेल्याचे चित्र बघावयास मिळाले.

"रावणाच्या लंकेत पेट्रेल स्वस्त,मात्र रामराज्यात महाग का ?"

पश्चिम बंगाल मध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठीचे वारे सध्या जोमाने वाहू लागल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच जे पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांनी लवकरात लवकर निघून जावे, बंगाल आणि तृणमूल कॉंग्रेसला तुमची गरज नसल्याचे हुगळीतील पुरसुराच्या सभेत म्हटले होते. हावडा येथील भाजपाच्या मेळाव्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना तृणमूलचे सगळे नेते भाजपमध्ये येत आहेत, त्यामुळे निवडणुकीपर्यंत ममता एकट्याच पक्षामध्ये राहतील, असंदेखील गृहमंत्री अमित शहा म्हणाले. परंतु, निवडणूकीच्या या साऱ्या चिंता दूर सारत मुख्यमंत्री ममता बनर्जी पारंपरिक नृत्याचा आनंद घेताना दिसल्या.

 

संबंधित बातम्या