West Bengal Election 2021: ''पश्चिम बंगालमध्ये भाजपचीच लाट''

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 6 एप्रिल 2021

पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमध्ये भाजपचीच लाट असल्याचा दावा केला आहे.

कुचबिहार: पश्चिम बंगालमध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. बंगालसह अन्य तीन राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये मतदान होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कूचबिहारमध्ये एक सभा घेतली. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी पहिल्या टप्प्यतील मतदान झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सत्तेतून जाणार असल्याचा दावा केला आहे. भाजपच्या 41 व्या स्थापना दिनानिममित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्य़ा कार्यकर्त्यांना संबोधित केले.

पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमध्ये भाजपचीच लाट असल्याचा दावा केला आहे. या लाटेने ममता बॅनर्जी आणि त्यांच्या गुंडांना चारही बाजूंनी घेरले आहे. असही मोदी यावेळी म्हणाले. तसेच मोदींनी ममता बॅनर्जी त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला आहे. ‘’पहिल्या दोन टप्प्याच्या मतदानामध्येच ममता बॅनर्जी सत्तेतून बाहेर पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अनेक मतदारांनी घराबाहेर पडत आमच्या पक्षाला मतदान केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचीच लाट आहे. या लाटेमध्य़े ममता बॅनर्जींंचे गुंड आणि त्यांच्या भाच्याला घेरलं आहे,’’ असं मोदी म्हणाले. (West Bengal Election 2021 BJP wave in West Bengal)

चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात आज मतदानाला सुरुवात

 

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय होईल असा दावा केला आहे. ‘’2 मे रोजी बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर येथे विकास कामं अधिक वेगाने होतील. तुमचा आशिर्वाद माझ्यासाठी खूप मोठी शक्ती असणार आहे. तुम्ही मला जे काही अफाट प्रेम देत आहात ते तुम्हाला 2 मे रोजी बंगालमध्ये सत्ता आल्यानंतर व्याजासकट परत करणार आहे. ते मी या भागाचा विकास करुन त्याची परतफेड करेन,’’ असंही मोदी यावेळी म्हणाले.

तसेच पुढे बोलताना मोदींनी, ‘’याच केंद्रीय निवडणुक आयोगाने दोन वेळा निवडणुका घेऊन तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं. आज तुम्हाला त्याच निवडणुक आयोगाचा त्रास होत आहे. यावरुनच दिसून येत आहे की, तुम्ही निवडणुक हरला आहात,’’ असं म्हटलं  

 

संबंधित बातम्या