West Bengal Election 2021: मोदींच्या 'दिदी ओ दिदी'ला ''गो मोदी गो' ने प्रत्युत्तर!

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 25 मार्च 2021

पीएम मोदी यांच्या ‘दिदी ओ दिदी’ च्या विधानावर तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी कठोर विधान करत सडेतोड प्रतिउत्तर देत, यावेळी बंगाल 'गो मोदी गो' असे उद्गार काढले आहे.

West Bengal Election 2021: बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला काहीच दिवस बाकी आहेत. बंगालमध्ये भाजप आणि टीएमसी दोघेही आपआपल्या पक्षासाठी जोरदार प्रचार करीत आहेत. काल बुधवारी बंगालच्या कांथी येथे निवडणूक जाहीर सभांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.

पंतप्रधान मोदींनी भर सभेत स्टेजवरून दिदी असा एका सूरात आवाज दिला, "जेव्हा गरज असते तेव्हा दिदी दिसत नाहीत, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ती सरकार दुआरे-दुआरे म्हणते! हा त्याचा खेळ आहे. ओ दिदी, ओ दिदी...अरे दिदी…बंगालचा प्रत्येत मुलाला ही खेळी समजली आहे," असे पंतप्रधान स्टेजहून बोलत होते.

प्राप्तिकर विभागाला आधार क्रमांक न दिल्यास भरावा लागणार दंड 

पीएम मोदी यांच्या ‘दिदी ओ दिदी’ च्या विधानावर तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी कठोर विधान करत सडेतोड प्रतिउत्तर देत, यावेळी बंगाल 'गो मोदी गो' असे उद्गार काढले आहे.

बंगालमधील 294 जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्च रोजी होईल. पहिल्या टप्प्यात 38 जागांवर मतदान होणार आहे. दुसर्‍या टप्प्यातील मतदान 1 एप्रिल रोजी होईल, त्याअंतर्गत लोक 30 जागांवर मतदान होणार. मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 6 एप्रिला निश्चित करण्यात आले आहे, जेथे लोक 31 जागांवर आपला मतदानाचा हक्क बजावतील. 10 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात 44 जागांसाठी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात 17  एप्रिल रोजी मतदान होणार असून तेथे 45 जागांसाठी मतदान होणार आहे. याशिवाय 22 एप्रिल रोजी सहाव्या टप्प्यात 41 जागा, २६एप्रिल रोजी सातव्या टप्प्यात 36 जागा, तर शेवटच्या आणि आठव्या टप्प्यातील 35 जागांवर मतदान होणार आहे. 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

देशाच्या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवणुकांचे पडघम जोरात वाजू लागले आहेत

 

संबंधित बातम्या