West Bengal Election: नेत्याचं तिकीट कापल्यामुळे कार्यकर्त्यांकडून जाळपोळ!

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 6 मार्च 2021

मुख्य़मंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या 291 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

कोलकाता:आगामी विधानसभा निवडणूकांसाठी तृणमुल कॉंग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर अनेक बड्य़ा नेत्यांची तिकिटे कापण्यात आली. लगेच त्याचे पडसाद बंगालमध्ये दिसून आले. त्यामध्ये नेतेमंडळी आणि त्य़ांच्या राजकिय कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या ठिकाणी शक्तीप्रदर्शेने सुरु झाली आहेत. काही कार्यकर्ते मंडळींनी कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न देखील केला.

मुख्य़मंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या 291 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र यामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांची तिकिटे कापण्यात आली. दक्षिण चोवीस परगणामधील भानगर भागातल्या इच्छुक नेते अराबुल इस्लाम यांचे तिकिट कापल्यानंतर इस्लाम यांनी निषेध व्यक्त केला आहे. मात्र त्य़ांच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको करत पक्ष कार्यालयातील सामानांची जाळपोळ करण्य़ास सुरुवात केली. तसेच दोन वेळा आमदार असणाऱ्या रफिकुर रहमान यांचही ममता बॅनर्जी यांनी तिकिट यावेळी कापलं आहे. त्यामुळे त्यांच्यांही कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग 24 अडवून निषेध व्यक्त केला आहे. तब्बल दोन तास हा महामार्ग जाम राहिल्यानंतर शेवटी सुरक्षा यंत्रणांनी आंदोलकांना हटवून हा रस्ता पुन्हा खुला केला.

पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्य़े बॉम्बहल्ला

रहमान यांच्याप्रमाणेच चार वेळा आमदारकी भूषवलेले सतगचिया आणि सोनाली गुहा यांची देखील यावेळेस ममता बॅनर्जी यांनी तिकीट कापलं आहे. त्यानंतर त्यांनीही तीव्र शब्दात आपला निषेध व्यक्त केला. सोनाली गुहा यांना तर चक्क माध्यमांसमोर रडूच आलं. त्यानंतर गुहा यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. 27 मार्चला पश्चिम बंगालमध्ये निवडणूका होणार आहेत. आणि मतमोजणी 2 मे ला होणार आहे.

 

संबंधित बातम्या