West Bengal Election: चंदना यांचा झोपडी ते विधानसभा प्रवास

दैनिक गोमंतक
सोमवार, 3 मे 2021

टीएमसीचे उमेदवार संतोषकुमार मंडल यांना ४ हजाराहून अधिक मतांनी पराभूत केले.

पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यात सालतोरा या मतदारसंघातून प्रथमच निवडणूक जिंकून भाजपच्या उमेदवार चंदना बाउरी विधानसभेवर पोहोचल्या आहेत. त्यांनी टीएमसीचे उमेदवार संतोषकुमार मंडल यांना ४ हजाराहून अधिक मतांनी पराभूत केले. या जागेची चर्चा होत आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात या मतदार संघातील उमेदवाराबद्दल खूप चर्चा केली होती. सालतोरा या जागेवरुन जेव्हा भाजपने त्यांना उमेदवारी दिली तेव्हा त्यांना शेजार्‍यांकडून याची माहिती मिळाली. त्यावेळी त्या घरी उपस्थित होत्या.(West Bengal Election: Chandana's journey from hut to assembly)

केंद्र व राज्यसरकारांनी पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करावा; सर्वोच्च न्यायालयाचा...

दररोज मजूरी करून आपले घर चालवतात 
उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानूसार चंदना बाउरी यांच्या स्वत: च्या बँक खात्यात केवळ 6,335 रुपये होते, तर त्यांच्या पतीच्या खात्यात केवळ  1,561 रुपये होते. निवडणूक प्रतिज्ञापत्रात चंदना यांनी सांगितले की, त्यांच्याकडे 31,985 रुपये एवढी संपत्ती आहे, तर पतीची  30,311 रुपये एवढी संपत्ती आहे. भाजपा उमेदवार चंदना आणि त्यांचे पती कोणत्याही शेत जमिनीचे मालक नाहीत. घरात तीन गाई आणि तीन बकरी एवढीच त्यांची संप्पती.  

पीएम आवास योजनेमार्फत घर 
चंदना या त्यांच्या पतीपेक्षा अधिक शिक्षित आहेत, त्यांचा नवरा फक्त आठवी पास आहे तर चंदना स्वत: बारावीपर्यंत शिकल्या आहेत. पती आणि पत्नी दोघेही मनरेगा कार्डधारक आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान आवास योजनेत घर बांधण्यासाठी चंदना आणि त्यांच्या पतीचा पहिला हप्ता मिळाला, ज्याच्या मदतीने त्यांनी दोन खोल्यांचे पक्के घर बांधले आहे.

नातवाला कोरोनापासून वाचवण्यासाठी वृद्ध दाम्पत्याने रेल्वेसमोर उडी घेतली

पंतप्रधान मोदींनी केले होते कौतूक 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा चंदना यांच्याशी चर्चा केली आहे. बांकुरा येथे झालेल्या निवडणूक जाहीर सभेत पंतप्रधानांनी चंदना यांची तीन वेळा स्तुती केली होती. आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरही त्यांनी अनेकदा चर्चा केली. चंदना यांचे पती श्रबान यापूर्वी फॉरवर्ड ब्लॉकचे सदस्य होते, परंतु त्यांचे म्हणणे आहे की 2011 मध्ये तृणमूल कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हा टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा छळ केला, त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

संबंधित बातम्या