West Bengal Election: प्रचारबंदीनंतर ममता बॅनर्जी जोपासतायेत छंद

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

प्रचारबंदीचा निषेध म्हणून ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरु केलं आहे.

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार आणि ममता बॅनर्जी विरुध्द भाजप असा कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याच पाश्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने सोमवारी 12 एप्रिल 2021 संध्याकाळी 8 ते मंगळवार 13 एप्रिल 2021 संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चोवीस तासांची प्रचारबंदी घालण्यात आली होती. प्रचारादरम्यान जनतेच्या भावना भडकावणारी विधाने केल्यामुळे  ममता बॅनर्जी यांच्यावर प्रचारबंदी घालण्यात आली आहे. या प्रचारबंदीचा निषेध म्हणून ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरु केलं आहे. विशेष म्हणजे आंदोलना दरम्यान कोणत्याही प्रकारचं वक्तव्य न करता ममता बॅनर्जी यांनी शांतपणे चित्र काढणं पसंत केलं आहे.

निवडूणक आयोगाने आपल्यावर घातलेली प्रचारबंदी पूर्णपणे घटनाविरोधी असल्याचे म्हणत ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी सकाळपासूनच ममता बॅनर्जी मायो रोड परिसरामधील गांधी मूर्ती येथे धरणे आंदोलनासाठी बसल्या आहेत. सकाळी 11.30 वाजल्यापासून त्यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय कृती न करता हातात कॅनव्हास घेऊन चित्रे काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (West Bengal Election Mamata Banerjee pursues hobbies after campaign ban)

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार '9' दिवसांचा उपवास

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाने 7 आणि 8 एप्रिल अशा दोन दिवशी नोटीसा बजावल्य़ा होत्या. मात्र ‘’ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या उत्तरामुळे समाधान न झाल्यामुळे अखेर निवडणूक आयोगाने प्रचारबंदीची कारवाई केली. ममता बॅनर्जी यांनी केलेली वक्तव्य लोकांना चेतवणारी होती. त्यामुळे निवडणूक प्रकियेला बाधा येत आहे,’’ असं निवडणूक आयोगाने पाठवलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यावर करण्यात आलेली कारवाई हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया तृणमुल कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी दिली आहे. 

 

संबंधित बातम्या