West Bengal Election:  ममता बॅनर्जीं विरुध्द सुवेंदू अधिकारी

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 6 मार्च 2021

ममता बॅनर्जी यांना नंदीग्राम मतदारसंघात सुवेंदू अधिकारी आवाहन देणार आहेत.

कोलकाता : आगामी पश्चिम बंगाल निवडणूकांमध्ये तृणमुल कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच ममता बॅनर्जी यांच्यासमोर मुख्यमंत्रीपदासाठी अद्याप भाजपला आपला उमेदवार ठरवता आलेला नाही. मात्र ममता बॅनर्जी यांच्या विरोधात कोण असा प्रश्न निर्माण झाला असताना भाजपने अखेर तृणमुल कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले विदयमान भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांची निवड केली आहे. आता ममता बॅनर्जी यांना नंदीग्राम मतदारसंघात सुवेंदू अधिकारी आवाहन देणार आहेत.

ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी आपल्या उमेदवारांची य़ादी जाहीर केली. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांनी या आगामी निवडणूकीत हक्काचा मानला जाणारा भोवानीपोरे मतदारसंघ सोडून नंदीग्राम मतदारसंघांची निवड केली आहे. शिवाय ममता यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा पर्याय असताना त्यांनी केवळ एकाच मतदारसंघातूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

West Bengal Election: नेत्याचं तिकीट कापल्यामुळे कार्यकर्त्यांकडून जाळपोळ!

सुवेंदू अधिकारी ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळात परिवहन मंत्री होते. ममता यांच्या मर्जीतील नेते म्हणून त्यांची ओळख होती. गेल्या निवडणूकीत माकप नेते लक्ष्मण सेठ यांचा पराभव केला होता. मात्र 2020 च्या शेवटच्या काही महिन्यात त्यांचे ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे संबंध ताणले गेले होते. याच पार्श्वभूमीवर सुवेंदू अधिकारी यांनी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला. 19 डिसेंबर रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

तृणमुल कॉंग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यामध्ये सुवेंदू अधिकारी, दिनेश त्रिवेदी यांच्यासह अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

 

संबंधित बातम्या