West Bengal Election: आता लक्ष्य बंगाल आणि नंतर दिल्ली; ममतांचे मोदींना खुले आव्हान

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 5 एप्रिल 2021

भाजप आणि टीएमसीकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमुल कॉंग्रेस आणि भाजप एकमेकांवर राजकिय आरोप-प्रत्यारोप करत असल्यामुळे वातावरण चांगलच तापलं आहे. बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार असून आतापर्यंत दोन टप्प्यामधील मतदान पार पडलेलं आहे. उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये 31 जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान भाजप आणि टीएमसीकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे, ‘’मी एका पायावर पश्चिम बंगाल जिंकेन आणि भविष्य़ामध्ये दोन्ही पायांवर दिल्लीवर विजय मिळवीन,’’ असं ममता बॅनर्जी यांनी यावेळी म्हटलं आहे.  

हुगळीमधील देवबंदपूर येथील एका रॅलीदरम्यान बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘’भाजपावाल्यानो तुम्ही बंगालमध्ये निवडणूक लढवण्यासाठी स्थानिक उमेदवार शोधू शकत नाही? त्यांच्याकडे आपला कोणताही स्थानिक उमेदवार नाही. निवडणूक लढवण्यासाठी तृणमुल कॉंग्रेस आणि सीपीएमकडून लोकं उधार घेतली आहेत. ती लोकं पाण्यासारखे पैशाचा वापर करत आहेत. जी लोकं नीट सोनार बांगला बनवू शकत नाहीत, ते बंगालवर काय राज्य़ करणार? मी आज एका पायावर बंगाल जिंकेन आणि भविष्यात दोन्ही पायांवर दिल्लीवर विजय मिळवीन.’’ (West Bengal Election now target Bengal and then Delhi Mamatas open challenge to Modi)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक : चौथ्या टप्प्यातील 22 टक्के उमेदवारांवर फौजदारी..

बंगालमधील आठ टप्प्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘’मतदान आठ टप्प्यामध्ये करण्याची काय गरज होती? भाजपच्या सांगण्यवरुनच निवडणूक प्रकिया लांबवण्यात आलेली आहे. कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता निवडणूक आयोगाने बंगालमध्ये अल्पावधीतच निवडणूक घ्यायला नको होती का?’’ पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यामध्ये विधानसभा निवडणूक होत आहेत. आता सहा टप्प्यामधील मतदान बाकी आहे

 

संबंधित बातम्या