West Bengal: भाजप कार्यकर्त्याच्या आईच्या मृत्यूनंतर ममता बॅनर्जीं व अमित शहा यांच्यात खडाजंगी

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 29 मार्च 2021

भाजप कार्यकर्त्याच्या आईचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला आहे ते मला माहीत नाही.

उत्तर चोवीस परगणा: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तृणमुल कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तृणमुल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यावर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या आईला मारहाण केल्याचा आरोप करण्य़ात आला. या मारहाणीमध्य़े या भाजप कार्यर्त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रीया दिली. याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांच्यावरही गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार हल्ला चढवला. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रीया दिली असून त्या म्हणाल्या, ‘भाजप कार्यर्त्याच्या आईचा मृत्यू कसा झाला हे मला माहित नाही’.

ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममध्ये बोलताना म्हणाल्या, ‘’भाजप कार्यकर्त्याच्या आईचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला आहे ते मला माहीत नाही. आम्ही महिलांच्या विरोधात हिंसेचं समर्थन करत नाही. त्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत, सध्या पश्चिम बंगालचे काय हाल झाले आहे. शहा यांनी मृत भाजप कार्यकर्त्याच्या आईला श्रध्दांजली वाहिली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधील प्रतिव्दंव्दी शुभेंदु अधिकारी यांच्यावर निशाणा साधत कोणत्याही प्रकारची लालसा योग्य नाही. (West Bengal Mamata Banerjee and Amit Shah clash after BJP workers mother dies)

West Bengal Election: भाजपा कार्यकर्त्याच्या आईच्या मृत्यूवरून अमित शहा...

27 फेब्रुवारी रोजी  पश्चिम बंगालमधील निमटा पोलिस ठाणे परिसरात भाजप कार्यकर्ते गोपाल मजूमदार यांच्यावर तृणमुल कॉंग्रेसच्या  गुंडांनी हल्ला केला होता. याचवेळी मजूमदार यांच्या आई यांनाही मारहाण करण्यात आली. हा सगळा घटनाक्रम लक्षात घेता भाजपकडून तृणमुल पक्षाच्या कार्यकर्त्यांवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मारहाणीनंतर भाजप कार्यर्त्याच्या आईचे पोस्टर लावण्यात आले होते.

गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत, ‘’बंगालची मुलगी शोवा मुजदार यांचे आज दुख:द निधन झाले आहे. त्यांना तृणमुल पक्षाच्य़ा गुंडांनी मारहाण केली होती. याशिवाय ममता बॅनर्जी यांच्यावर टिका करताना, या घटनेच्या वेदना आणि जखमा ममता बॅनर्जी यांना बराच काळ त्रास देत राहतील. तसेच बंगाल महिलांसाठी मुक्त आणि सुरक्षित समाजासाठी लढा देईल,’’ असं त्यांनी म्हटले आहे. 

 

संबंधित बातम्या