Rajasthan: 8 वर्षीय मुलींची स्टॅम्प पेपरवर होतेय विक्री, गेहलोत सरकारला NHRC ची नोटीस

Rajasthan Crime: राजस्थानातील मुलींच्या लिलावावर आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे.
Girl
GirlDainik Gomantak

Rajasthan Crime: राजस्थानातील मुलींच्या लिलावावर आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. मानवाधिकार आयोगाने अशोक गेहलोत सरकारला नोटीस पाठवून या प्रकरणी काय कारवाई केली, अशी विचारणा केली आहे. खरं तर, आयोगाने मीडिया रिपोर्टची स्वतःहून दखल घेतली आहे. 8 ते 18 वयोगटातील मुलींची स्टॅम्प पेपरवर विक्री होत असल्याचा दावा करणाऱ्या अहवालावर आयोगाने राजस्थान सरकारला नोटीस बजावली आहे.

दरम्यान, या नोटीसमध्ये एनएचआरसीच्या वतीने सांगण्यात आले की, या मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, कर्ज न फेडू शकल्याने राजस्थानातील (Rajasthan) अर्धा डझनहून अधिक जिल्ह्यांमध्ये मुलींची खरेदी-विक्री केली जात आहे. या मुलींना यूपी, एमपी, मुंबई (Mumbai), दिल्ली व्यतिरिक्त परदेशात पाठवले जात आहे, जिथे त्यांचा लैंगिक छळ केला जात आहे.

Girl
Azam Khan: द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी आझम खान यांना तीन वर्षांची शिक्षा

दुसरीकडे, एनएचआरसीने या मीडिया रिपोर्टबद्दल म्हटले की, 'जर हा अहवाल खरा असेल तर ते मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. त्यामुळे राजस्थानच्या मुख्य सचिवांना नोटीस पाठवण्यात आली असून त्यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. याप्रकरणी काय कारवाई केली, अशीही विचारणा करण्यात आली आहे.'

तसेच, राजस्थानमधील ग्रामपंचायतींच्या कार्यशैलीवर आयोगाने प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा पंचायतीमुळे महिलांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे बोलले जात आहे. या घटनांमध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी आयोगाने केली आहे. आयोगाने राजस्थानच्या डीजीपींनाही नोटीस पाठवली आहे. आयोगानेही आपले सदस्य तिथे पाठवून या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यास सांगितले आहे. आयोगाने आपल्या सदस्याला चौकशीनंतर सविस्तर अहवाल आयोगाला सादर करावा, असेही सांगितले आहे.

Girl
द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी वसीम रिझवी यांना SC कडून दिलासा, सशर्त जामीन मंजूर

याआधी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीही हा मीडिया रिपोर्ट ट्विट केला होता. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, 'काँग्रेस (Congress) पक्षाचा नारा 'लड़की हूँ लड़ सकती हूँ' असा होता. पण राजस्थानमधील वास्तव बघा, जिथे मुलींची खुलेआम विक्री होत आहे. काँग्रेसच्या कुशासनाला कंटाळून आता राजस्थानच्या कन्या म्हणतायेत की, 'मी मुलगी आहे, मी जगू शकते, तरच मी राजस्थानमध्ये राहू शकते.'

Girl
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना चार वर्षांची शिक्षा

शिवाय, संबित पात्रा यांनी 'दैनिक भास्कर'च्या एका अहवालाचा हवाला दिला होता, ज्यामध्ये राजधानी जयपूरपासून 340 किमी अंतरावर असलेल्या भीलवाडामधील गावातल्या पांडेरमध्ये मुलींची खरेदी-विक्री सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. येथील अनेक वस्त्यांमध्ये राहणाऱ्या गरीब मुलींची स्टॅम्प पेपरवर दलालांकडून खरेदी-विक्री केली जाते, असा दावा या मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये काही मुलींशी बोलल्याचा दावा करण्यात आला होता. या मुली सांगत होत्या की, 'पहिल्यांदा आमची विक्री करण्यात आली त्यानंतर बलात्कार करण्यात आला.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com