mucormycosis
mucormycosis

म्युकोरमाइकोसिस पासून वाचण्यासाठी काय कराल? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

देशातल्या अनेक ठिकाणी कोरोना संक्रमणासोबतच म्युकोरमाइकोसिस (Mucormycosis) या ब्लॅक फंगसचे (Black Fungus) रुग्ण सुद्धा वाढत आहेत. दिल्ली, गुजरात, राजस्थान सारख्या राज्यांत या ब्लॅक फंगसच्या संक्रमणामुळे अनेक रुग्णांचा जीव गेला असून अनेक जणांना आपली दृष्टी कायमची गमवावी लागली आहे. याच पार्शवभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री (Minister of Health and Family Welfare) हर्ष वर्धन (Dr. Harsh Vardhan)यांनी या ब्लॅक फंगस बद्दल महत्वाची माहिती दीली आहे. यामध्ये या आजाराच्या लक्षणांपासून ते आजार होऊ नये म्हणून घेण्याच्या पूर्वकाळजीबद्दल माहिती देण्यात आली आहे. (What can you do to prevent mucormycosis)

ब्लॅक फंगसबद्दलची जागरूकता तसेच लवकरात लवकर या आजाराला ओळखणे या गोष्टी या आजाराच्या संक्रमणाला थांबवू शकतो असे  केंद्रीय स्वास्थ्य मंत्री हर्ष वर्धन यांच्याकडून सांगण्यात येते आहे. म्युकोरमाइकोसिसच्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार सगळे निर्णय घेत असून, या अजावरील औषध अँफोटेरीसिन बी उपलब्ध करण्यासाठी देखील सरकार तयारी करत असल्याचे सांगण्यात आले आहे. 

म्युकोरमाइकोसिस काय आहे?
हा एक बुरशीजन्य आजार असून, साधारणतः शारीरिक आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे या रुग्णाची रोगाशी लढण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिकारशक्ती कमी होते. 

म्युकोरमाइकोसिस कोणाला होऊ शकतो ?
आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार एखाद्या आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णाला या ब्लॅक फंगसचे संक्रमण होऊ शकते. तसेच वोरकोनाजोल थेरेपी घेणाऱ्या रुग्णांना देखील या फंगसचे संक्रमण होऊ शकते. 

काय आहेत लक्षण?
म्युकोरमाइकोसिस रुग्णांच्या डोळे आणि नाकाजवळ लाल रंगाचे डाग दिसू लागतात किंवा त्याठिकाणी त्रास होऊ शकतो. त्याव्यतिरिक्त ताप, डोकेदुखी, कफ, श्वास घेण्यास त्रास होणे, रक्ताची उलटी होणे आणि मानसिक संतुलन बिघडणे अशी लक्षण सुद्धा दिसून येतात. 

काय करावे आणि काय करू नये!
आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या या माहितीनुसार हाइपरग्लाइकेमियाला नित्यानंतरणात ठेवायला हवे. डायबिटीज असणाऱ्या लोकांना जर कोरोनाची झाला असेल तर रुग्णांलयातून बाहेर आल्यानंतर किंवा कोरोनाचे उपचार संपल्यानंतर त्यांनी आपल्या ब्लड ग्लुकोज लेव्हलवर लक्ष ठेवायला पाहिजे. स्टेरॉईडचे सेवन करणे टाळावे किंवा सतर्कतेने करावे. ऑक्सिजन थेरेपी दरम्यान, स्वछ आणि स्टेरलाईट पाण्याचा वापर करावा. तसेच अँटी बायोटिक आणि आणि फंगल औषधांचा वापर सुद्धा लक्षपूर्वक करावा. 
म्युकोरमाइकोसिस च्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, तसेच तपासणी करण्यास देखील घाबरू नये असा सल्ला देखील देण्यात आला आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com