मॉन्सून म्हणजे काय? तो ओळखायचा कसा? जाणून घ्या...

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 जून 2021

जून महिना आला की सगळीकडे मॉन्सून नेमका कधी येणार? यंदा मॉन्सून किती टक्के राहणार? कसा होणार? अशी चर्चा सुरु होते.

नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) (Monsoon) गुरुवारी केरळमध्ये (Kerala) दाखल झाले. असे हवामान विभागाने जाहीर केले आहे. हवामान  विभागाकडून (Meteorological Department) यंदाच्या वर्षी सरासरी 101 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज करण्यात आला आहे. दरम्यान पुढील दोन दिवसामध्ये गोव्यासह(Goa) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक ठिकाणी, तसेच मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परंतु मॉन्सून आणि मॉन्सूनपूर्व पाऊस या दोन्ही गोष्टींमध्ये नेमका काय फरक आहे? अनेकदा हे दोन शब्द आपल्या वाचनात सतत येतात. पण त्याचा नेमका अर्थ काय? या दोघांमध्ये फरक काय असतो आणि यासंदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.. (What is monsoon How to recognize it Find out )

जून महिना आला की सगळीकडे मॉन्सून नेमका कधी येणार? यंदा मॉन्सून किती टक्के राहणार? कसा होणार? अशी चर्चा सुरु होते. मे महिन्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात आलेला पाऊस म्हणजे मॉन्सूनपूर्व आणि एखाद्या विशिष्ट तारखेला येणारा पाऊस म्हणजे मॉन्सून असेही हवामान खाते आणि हवामान तज्ञांकडून सांगण्यात येते. परंतु मान्सूनचा पाऊस ओळखायचा कसा? त्या विशिष्ट पडणाऱ्या पावसाला मान्सून का म्हणायचं असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. यातील नेमका फरक समजून घेण्यासाठी काही गोष्टींची माहिती आपणास असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! यंदा शत:प्रतिशत मॉन्सून...

मॉन्सून पूर्व पाऊस सामान्य निरिक्षणांवरुन आपण कसा ओळखता येतो..

1 मॉन्सूनपूर्व पाऊस येण्यापूर्वी दिवसभर खूप गरम होते, ही गरमी असह्य होते आणि मग पाऊस येतो. मॉन्सूनमध्ये ढग जमू लागतात. ऊन आणि सावल्यांचा लपंडाव सुरु होतो, काहीवेळा संथ वाराही वाहू लागतो. आणि त्यानंतर पाऊस येतो.

2 मान्सूनपूर्व पाऊसामध्ये उष्णतेमुळे ढग निर्माण होतात. हवा खालून वर जाऊ लागते आणि  अखेर बाष्प साठून पाऊस पडतो. मॉन्सून काळात ढग जमिनीला समांतर अशा दिशेने पुढे सरकतात आणि पाऊस पडण्यास सुरुवात होते.

पावसाचे ढग मॉन्सूनपूर्व दाट असतात त्याचबरोबर त्याची उंची आणि जाडीही खूप असते. मॉन्सूनचे ढग कमी जास्त उंचीचे नसतात. त्याची जाडीही कमी असते आणि पसरलेले असतात.

4 मॉन्सूनपूर्व पाऊस कमी पटट्यात पडतो तर दुसरीकडे मॉन्सूनचा पाऊस तुलनेने जास्त टप्प्यात आणि विस्तृत क्षेत्रात पडतो.

5 मॉन्सूनपूर्व पाऊसाचे रौद्र रुप पहायला मिळते. मात्र मॉन्सून संथ आणि शांतपणे येतो.

मॉन्सूनच्या गतीला थोडासा ब्रेक, 3 जूनपर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता

मॉन्सून ओळखण्याच्या पध्दती...

1 मॉन्सूनमध्ये वाऱ्याची गती, दिशा यांचा अभ्यास करण्यात येतो. त्यानुसार मॉन्सून पावसाचा अंदाज लावण्यात येतो. मॉन्सून पाऊस नैऋत्य दिशेने दाखल होतो. मात्र दुसरीकडे मॉन्सूपूर्व पावसासाठी विशेष असे कोणते अंदाज नसतात.

2 ढगांनी आकाश अच्छादलेले आहे यावरुन मॉन्सून ओळखता येतो. मात्र मॉन्सूनपूर्वमध्ये असा कोणत्याही प्रकारचा निकष नसतो. 

3 केरळमध्ये मॉन्सून आला हे ओळखण्यासाठी त्या विशिष्ट ठिकाणी काही जागा निश्चीत केलेल्या आहेत. त्या ठिकाणी विशिष्ट प्रमाणात पाऊस पडल्यास तो मॉन्सून आहे असा निष्कर्ष काढण्यात येतो.

4 याशिवाय बाष्पयुक्त ढगांचा पट्टा कुठपर्यंत सरकला आहे यानुसार मॉन्सून ओळण्यासाठी मदत होते. या मॉन्सून ओळखण्याच्या काही पध्दती आहेत त्यांचा अभ्यास केल्यानंतरच मॉन्सून पावसाची ओळख पटते.

मुख्यत: शेतकरी पावसाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. तो मॉन्सून की मॉन्सूपूर्व हे वरील काही निकषांच्या आधारे ओळखता येते. मॉन्सून नेमका कधी येणार आणि त्याच्या आधी आलेला पाऊस हा मॉन्सूनपूर्व आहे का, हे ओळखण्यासाठी किमान निरिक्षणे नोंदवल्यास सामान्य नागरिकांना यातील फरक समजून घेता येतो. 
 

संबंधित बातम्या