15 मे नंतर व्हॉट्सअ‍ॅपचे अकाउंट बंद होणार नाही, तर आपल्या सर्व सेवा बंद केल्या जातील

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 12 मे 2021

व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा एकदा आपल्या प्रायव्हसी पॉलिसीामुळे चर्चेत आला आहे. 15 मे नंतर व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक नोटिफिकेशन मिळणार आहेत. युजर्सने नवीन प्रायव्हसी पॉलिसी न स्वीकारल्यास त्यांच्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप युज करणे त्रासदायक होऊ शकतो.

व्हॉट्सअ‍ॅप(WhatsApp) पुन्हा एकदा आपल्या प्रायव्हसी पॉलिसीामुळे(Privacy policy) चर्चेत आला आहे. 15 मे नंतर व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक नोटिफिकेशन(Notification) मिळणार आहेत. युजर्सने(Users) नवीन प्रायव्हसी पॉलिसी न स्वीकारल्यास त्यांच्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप युज करणे त्रासदायक होऊ शकतो. अशा परिस्थितीत ज्यांना व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्याची इच्छा नाही त्यांचा त्रास वाढू शकतो. आपण व्हॉट्सअ‍ॅपची प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारत नसाल तर यासाठी तुम्हाला अतिरिक्त वेळही देण्यात येईल, परंतु नवीन पॉलिसी स्वीकारणे तुम्ही टाळू शकत नाही. (WhatsApp account will not be closed after May 15 but all your services will be closed)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा युवकांना बसतोय फटका; ICMR नं सांगितलं कारण 

15 मे नंतर काय होणार?
जर आपण व्हॉट्सअ‍ॅपची प्रायव्हसी पॉलिसी न स्वीकारल्यास कंपनी आपले अकाउंट बंद करणार नाही. मात्र प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्यासाठी कंपनीकडून अशा वापरकर्त्यांना 15 मे नंतर एक सूचना पाठविली जाईल. अशाप्रकारे व्हॉट्सअ‍ॅपवरून सतत रिमांइंडर नोटिफिकेशन पाठविली जातील. अशा परिस्थितीत आपण नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारले असल्यास ते चांगले आहे, अन्यथा आपल्याला काही अडचणी येऊ शकतात. आपण प्रायव्हसी पॉलिसी न स्वीकारल्यास कंपनी व्हॉट्सअ‍ॅपची काही सेवा बंद करू शकते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जी-7 दौरा रद्द 

प्रायव्हसी पॉलिसी स्विकारली नाही  तर

प्रायव्हसी पॉलिसी स्विकारली नाही तर व्हॉट्सअ‍ॅपचे रिमाइंडर पाठवूनही आपण ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकणार नाही. जर आपण प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारत नसाल तर आपले खाते बंद केले जाणार नाही, परंतु आपल्याला आपली चॅट लिस्ट पाहता येणार नाही. आपण फक्त व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल स्वीकारू शकू. यानंतरही आपण नवीन पॉलिसी स्वीकारत नसाल तर व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे-जाणारे ऑडिओ व व्हिडीओ कॉल देखील बंद होईल. 

आपण व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाठवू शकणार नाही
जर आपण व्हॉट्सअ‍ॅपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारली नसेल तर आपण कोणालाही SMS पाठवू शकणार नाही. आपण व्हॉट्सअ‍ॅपवर कोणालाही कॉल करू शकणार नाही. म्हणजेच, याचा अर्थ असा की, जर आपण व्हॉट्सअ‍ॅपचे नविन प्रायव्हसी पॉलिसीं स्विकारले नाही तर आपले व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बंद होणार नाही, तर आपल्या सर्व सेवा बंद केल्या जातील. 

संबंधित बातम्या