WhatsApp India Head Resigns: फेसबुकपाठोपाठ आता व्हॉट्सअ‍ॅप इंडियाच्या प्रमुखांचा राजीनामा

मेटा इंडियाच्या पब्लिक पॉलिसी डायरेक्टर यांनीही सोडले पद
WhatsApp India Head Resigns
WhatsApp India Head ResignsDainik Gomantak

WhatsApp India Head Resigns: व्हॉट्सअॅप इंडियाचे प्रमुख अभिजीत बोस आणि मेटा इंडियाचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर राजीव अग्रवाल या दोघांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारतात आता व्हॉट्सअॅप पब्लिक पॉलिसीचे डायरेक्टर शिवनाथ ठकराल यांना आता भारतातील सर्व मेटा ब्रँड्ससाठी पब्लिक पॉलिसी डायरेक्टर म्हणून नियुक्त केले गेले आहे.

WhatsApp India Head Resigns
Anand Mahindra: झोप पुर्ण होत नसेल तर... उद्योगपती आनंद महिंद्रांच्या पत्नीचा अबज सल्ला व्हायरल...

मेटा कंपनीने नुकतेच त्यांची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात केली होती. यात जगभरातून सुमारे 11 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले होते. त्यानंतर ही घडामोड समोर आली आहे. दरम्यान, या महिन्याच्या सुरवातीलाच मेटा कंपनीचे भारतातील प्रमुख अजित मोहन यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

WhatsApp चे प्रमुख विल कॅथकार्ट यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मी भारतात WhatsApp चे आमचे पहिले प्रमुख अभिजीत बोस यांना त्यांच्या जबरदस्त योगदासाठी धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी एंटरप्रेनोरियल ड्राईव्हने आमच्या टीमला नव्या सेवा उपलब्ध करून देण्यात मदत मिळाली.

WhatsApp India Head Resigns
Morbi Bridge Case: जास्त हुशारी दाखवू नका, प्रश्नांची उत्तरे द्या! हायकोर्टाने मोरबी नगरपालिकेला फटकारले

त्यामुळे लाखो युजर्सचा आणि उद्योजकांचाही लाभ झाला आहे. WhatsApp भारतासाठी आणखी खूप काही करू शकते. आणि आम्ही भआरतातील डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनला पुढे घेऊन जाण्यासाठी उत्साही आहोत. दरम्यान, आता बोस यांच्या जागी नव्या व्यक्तीची नियुक्ती केली जाणार आहे.

दरम्यान, कंपनीने म्हटले आहे की, राजीव अग्रवाल यांना दुसऱ्या कंपनीने चांगली संधी दिली आहे, त्यामुळे त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गत एका वर्षात देशातील डिजिटल सहभागासाठी युजर सेफ्टी, प्रायव्हसी आणि इतर कार्यक्रमात अग्रवाल यांनी नेतृत्व करत योगदान दिले आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com