व्हॉट्स अ‍ॅपचे हे नवीन अपडेट तुमच्यासाठी ठरू शकते धोकादायक

हे अपडेट तुमचे खाते हॅक देखील करू शकते
Whatsapp
WhatsappDainik Gomantak

व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक भाग बनला आहे. माणसांच्यातला दुरावा दूर करणारा दुआ बनला असून , Android साठी WhatsApp ची नवीन अपडेट अली आहे.पण सावधान! सुधारित अपडेटमध्ये नवीन नकलीपणा सापडला आहे. यालाच ट्रोजन ट्रायडा म्हणतात. हे अ‍ॅप डाऊनलोड (Download) केल्यानंतर तुम्ही अडचणीत येऊ शकता. हे अपडेट तुमचे खाते हॅक देखील करू शकते. चुकून हे अपडेट (Update) डाउनलोड करू नका.

Whatsapp
काय आहे Instagramचे ॲंटी ॲब्युज फिचर?
  • काही दिवसांपूर्वीच गुगल प्ले स्टोअरवरून अनेक अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. गुगलने हे आपले प्लॅटफॉर्म आणखीनच सुरक्षित करण्यासाठी केले आहे. परंतु Google Play Store वर अजूनही अनेक अ‍ॅप्सच्या सुधारित आवृत्त्या आहेत, ज्या वापरकर्त्याच्या डिव्हाइसला हानी करू शकतात. अँड्रॉइडसाठी व्हॉट्स अ‍ॅपच्या सुधारित आवृत्तीत नवीन ट्रोजन सापडला आहे. याला ट्रोजन ट्रायडा म्हणतात. यामुळे वापरकर्त्याच्या संमतीशिवाय डिव्हाइस वापरतो. आणि तुम्हाला अडचणीत आणू शकते.

  • नवीनच सायबर सुरक्षा प्रमुख कॅस्परस्कीकडून हाती आलेल्या अहवालामध्ये, ट्रोजन ट्रायडा FMWhatsApp 16.80.0 व्हॉट्स अ‍ॅपपच्या सुधारित आवृत्तीवर परिणाम करते असे टीमच्या संशोधकांनी सांगितले आहे. कॅस्परस्कीच्या मते, ट्रोजन ट्रायडाने आता त्याच्या जाहिरात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट (SDK) सह FMWhastApp च्या नवीन आवृत्तीत प्रवेश केला आहे. जर तुम्ही एखादे अ‍ॅप डाऊनलोड केले. आणि यात जर का व्हायरस असेल तर ते डिव्हाइस आयडेंटिफायर (डिव्हाइस आयडी, सबस्क्राइबर आयडी, ) गोळा करेल आणि त्यांना रिमोट सर्व्हरवर परत पाठवेल.

Whatsapp
WhatsApp यूजर्ससाठी लवकरच आणणार नवीन 'स्टेटस अपडेट'

हॅकर्स अशा प्रकारे तुमचे खाते हॅक करतील

FMWhatsApp द्वारे अशा प्रकारचे उपक्रम राबवणाऱ्या संशोधकांनी अनेक प्रकारचे मालवेअर व्हायरस शोधले आहेत. आणखी एक मालवेअर व्हायरस आहे जे संक्रमित डिव्हाइसवर अनेक कार्ये करू शकते, शिवाय ते पूर्ण पणे जाहिरातीच्या स्वरूपात आहे. याच मुळे आपल्याला अधिक जाहिराती दिसतात आणि आपल्या परवानगीशिवाय साइन ते अप देखील करू शकतात. कॅस्परस्कीने असे अ‍ॅप्स डाउनलोड करण्याविरोधात सूचना केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com