तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरता का? मग जाणून घ्या या नवीन सुविधेविषयी...

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

व्हॉट्सअॅप लवकरच आपले एक नवीन फीचर आणण्याच्या प्रयत्नात आहे. डिसॅपिअरिंग मॅसेज हे असे या नवीन फीचरचे नाव असून आपण हा पर्याय स्वीकारल्यास त्यानंतर येणारे सर्व नवीन संदेश 7 दिवसांनंतर नाहीसे होतील.

नवी दिल्ली- व्हॉट्सअॅप लवकरच आपले एक नवीन फीचर आणण्याच्या प्रयत्नात आहे. डिसॅपिअरिंग मॅसेज हे असे या नवीन फीचरचे नाव असून आपण हा पर्याय स्वीकारल्यास त्यानंतर येणारे सर्व नवीन संदेश 7 दिवसांनंतर नाहीसे होतील. डब्ल्यूएबिटाइन्फोने या बद्दल काही महत्वाची माहिती तपशीलवार दिली आहे.

व्हॉट्सअॅप वापरकर्ते कधीही हे फीचर वापरू शकतात. परंतु या फीचरसह कस्टमाईज करण्याचा पर्याय उपलब्ध राहणार नाही. याचा अर्थ असा की आपण एकदा हे फीचर सुरू केले की येणारे संदेश सात दिवसांनंतर नाहीसे होतील. डब्ल्यूएबिटाइन्फोच्या म्हणण्यानुसार वापरकर्त्याने 7 दिवस संदेश बघितला नाही तर तो संदेश तेथून नाहीसा होईल. परंतु वापरकर्त्याने नोटिफिकेशन पॅनेल क्लिअर न केल्यास आपण तेथून संदेश तपासू शकाल. याव्यतिरिक्त जर एखाद्या डिसॅपिअरिंग संदेशला तुम्ही ‘कोट’ करून उत्तर दिल्यास सात दिवसांनंतर आपोआप ते कोटेड संदेश चॅटमध्ये उपस्थित होतील. 

डब्ल्यूएइन्फोने दिलेल्या माहितीनुसार आपण आपले चॅट सात दिवसानंतर नाहीसे होण्याच्या आधी जर त्याचा बॅक अप घेतला असेल तर तो संदेश साठा आपल्याला ड्राईव्हमध्ये आढळून येईल. मात्र, जर आपण नाहीसे होणारे संदेश बॅकअपमधून परत घेण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला ते संदेश मिळणार नाहीत. ते त्याआधीच तेथून नाहीसे झालेले असतील. मात्र, नाहीश्या होणाऱ्या संदेशांना तुम्ही पुढे पाठवू शकता किंवा त्याचा स्क्रीन शॉट घेऊ शकता. ही सुविधा आयओएस, अँड्रॉईड, केआयओएस आणि वेब किंवा डेक्सटॉप वापरकर्त्यांसाठी आहे.            

 

संबंधित बातम्या