व्हॉट्सअ‍ॅप-पे आजपासून भारतात सुरू; कसे कराल पेमेंट? वाचा...

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

 ही पद्धत युपीआय आधारीत असून तितकीच सोपी आणि सुलभ आहे. या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापासून या फीचरची चाचणी घेण्यात येत होती. व्हॉट्सअ‍ॅपने ही सुविधा आता बाजारात आणली आहे. याद्वारे वापरकर्ते आपल्या बँक खात्याशी जोडून पैसे पाठवू शकतात.

नवी दिल्ली- बऱ्याच काळाच्या प्रतीक्षेनंतर व्हॉट्सअ‍ॅपने आपले नवीन फीचर बाजारात आणले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून पैशांची देवाण-घेवाण करणे आता अधिक सुलभ होणार आहे. याबाबतीत ट्वीट करत कंपनीने नवीन फीचर आणत असल्याचे सांगितले आहे. भारतातील व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना आजपासून व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवता येणे शक्य होणार आहे. 

 व्हॉट्सअ‍ॅप पे विषयी ठळक- 

 ही पद्धत युपीआय आधारीत असून तितकीच सोपी आणि सुलभ आहे. या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापासून या फीचरची चाचणी घेण्यात येत होती. व्हॉट्सअ‍ॅपने ही सुविधा आता बाजारात आणली आहे. याद्वारे वापरकर्ते आपल्या बँक खात्याशी जोडून पैसे पाठवू शकतात. म्हणजेच आता व्हॉट्सअ‍ॅपवरून  पैसे पाठवता येणार आहेत. ही सुविधा आयसीआयसीआय, एसबीआय, अॅक्सिस बँक, एचडीएफसी आणि एअरटेल पेमेंटला उपलब्ध आहे.    

कसे कराल व्हॉट्सअ‍ॅप पे चालू- 

सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅपला प्ले- स्टोअरमध्ये जाऊन अपडेट करा. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप उघडा. त्यानंतर उजव्या बाजूला दिलेल्या मेन्यूवर क्लिक करा. येथे पेमेंटचा नवीन पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध असेल. त्यानंतर  अक्सेप्ट आणि कंटिन्यू वर क्लिक करा. तेथे तात्काळ तुम्हाला बँकांची यादी दिसेल. बँक खाते निश्चीत केल्यावर तुमचा फोन नंबर तपासून बघितला जाईल. यासाठी तुम्ही वापरता तो व्हॉट्सअ‍ॅपचा नंबर आधीच तुमच्या बँक खात्याला जोडलेला असेल तरच तुम्ही ही सुविधा सुरू करू शकता. त्यानंतर एक संकेतांक टाकून तुम्ही ही सुविधा वापरू शकता.         

संबंधित बातम्या