शशी थरुर पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागताना म्हणतात...

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

आपले पंतप्रधान बांग्लादेशला फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत. सगळ्यांनाच माहीत आहे की, बांग्लादेशला स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं.

नवी दिल्ली: बांग्लादेशच्या 50  व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदी बांग्लादेश दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी बांग्लादेश दौऱ्यात बोलताना एक विधान केलं होतं. ''बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यालढ्यातही मी माझ्या सहकाऱ्यांसोबत सहभागी झालो होतो,'' असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. त्यावरुन कॉंग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर यांनी मोदींवर टिका केली होती. 'पंतप्रधान बांग्लादेशला फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत.' असं थरुर म्हणाले होते. मात्र टिका करताना चूक लक्षात आल्यानंतर शशी थरुर यांनी प्रांजळपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय बांग्लादेश दौऱ्य़ावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी ढाकामध्ये बोलत असताना बांग्लादेशच्या स्वातंत्र्यालढ्याच्या आठवणींना उजाळा दिला. ''बांग्लादेशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मी सहभागी झालो होतो, त्यावेळी मला अटक झाली होती आणि तुरुंगातही जावं लागलं होतं,'' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यावरुन खासदार शशी थरुर यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. (When Shashi Tharoor apologizes to Prime Minister Narendra Modi) 

''देशाचा औद्योगिक विकास खुंटला असून नरेंद्र मोदींची दाढीच वाढते आहे...

''आपले पंतप्रधान बांग्लादेशला फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत. सगळ्यांनाच माहीत आहे की, बांग्लादेशला स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं,'' अशी टीका शशी थरुर यांनी केली होती. टिका करताना थरुर यांनी चूक लक्षात आल्यानंतर दुसरं ट्विट करत माफी मागत त्याची कबुली दिली. माझी चूक असल्यास मला माफी मागण्यात काही वाईट वाटत नाही. काल मी काही बातम्यांचे मथळे वाचल्यानंतर ट्विट केलं होतं. 'बांग्लादेशाला स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं हे सर्वांना माहीत आहे' असं मी म्हणालो होतो. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतपूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचा उल्लेख केला नाही, असा त्याचा अर्थ होता. पण त्याचा उल्लेख केला...सॉरी ''असं ट्विट करत थरुर यांनी म्हटलं आहे.

 

संबंधित बातम्या