West Bengal Results: निवडणूक जिंकवणारा "खेला होबे" हा नारा आला कुठून ?

दैनिक गोमंतक
रविवार, 2 मे 2021

संपूर्ण निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या या नाऱ्याची चर्चा होती. हा नारा नेमका आला तरी कुठून?

निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून दिल्या जाणाऱ्या नाऱ्यांची सर्वत्र चर्चा होत असते, किंबहुना हे नारेच त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचे काम करत असतात. पश्चिम बंगलामध्ये तृणमुल काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्ष मोठ्या ताकदीने मैदानात उतरला होता. मात्र ममता बॅनर्जी यांनी "खेला होबे" म्हणत भाजपला तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. संपूर्ण निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या या नाऱ्याची चर्चा होती. हा नारा नेमका आला तरी कुठून? हा नारा प्रशांत किशोर यांनी दिला होता का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाले आहेत.(Where did the election winning slogan "Khela Hobe" come from?)

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस (Trinmool Congress) पक्षाने 200 पेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. तर ममता बॅनर्जी यांनी  भारतीय जनता पक्षाचे सुवेन्दू अधिकारी यांना 1200 मतांनी पराभूत केले आहे. भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालच्या या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने लढत दिली असल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक केंद्रीय नेते बंगालमध्ये प्रचाराची धुरा सांभाळताना पाहायला मिळाले होते. मात्र "खेला होबे"(Khela Hobe) या एका नाऱ्याने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकऱ्यांमध्ये जोश निर्माण करण्याचे काम केले. पुढे या नाऱ्याचे गाणे देखील तयार झाले. हा नारा दिला होता नुकतेच राजकारणात आलेले 25 वर्षीय सिव्हिल इंजिनिअर देबांगशु भट्टाचार्य (Debangshu Bhattacharya) यांनी. पुढे  या नाऱ्याची लोकप्रियता वाढताना दिसत असल्याने ममता बॅनर्जी यांनी प्रचार सभांमध्ये हा नारा देण्यास सुरुवात केली. 

प्रशांत किशोर यांनी मागच्यावर्षी केलेली भविष्यवाणी ठरेय खरी? 

खेला होबे या नाऱ्या पूर्वी देबांगशु भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेससाठी अनेक गीत लिहिले आहेत. त्यांनी लिहिलेले "ममता दीदी और एक बार" आणि "दिल्ली जावे हवाई चोटी" हे गाणे देखील प्रसिद्ध झाले होते.

संबंधित बातम्या