महीलेने कार चालवताना मोबाईलवर कोरोना रिपोर्ट पहिला आणि घडला अनर्थ

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

कोरोनामुळे संपूर्ण जग आज त्रस्त असल्याचे पाहायला मिळते आहे. प्राणघातक अशा या कोरोना विषाणूची प्रत्येकाच्याच मनात भीती आहे. आपला कोरोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते.

कोरोनामुळे संपूर्ण जग आज त्रस्त असल्याचे पाहायला मिळते आहे. प्राणघातक अशा या कोरोना विषाणूची प्रत्येकाच्याच मनात भीती आहे. आपला कोरोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. असाच धक्का केरळमधील एका महिलेला बसला आणि हा धक्का या महिलेच्या जीवावर बेतणारा ठरला आहे. मात्र सुदैवाने या घटनेत या महिलेचा जीव वाचला. (While driving the car, Corona reported on the mobile and the woman had an accident)

धक्कादायक! कोरोनाच्या सरकारी रूग्णालयात माळी घेतायेत सैंपल

केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील कडकक्कल येथील एका 40 वर्षीय महिलेला कार चालवत असताना आपल्याला मोबाईल वरून मिळालेल्या रिपोर्ट मधून आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजले. कोरोना बाधित झाल्याच्या धक्क्यात या महिलेकडून कार अनियंत्रित झाली आणि भरधाव वेगात असणारी ही कार थेट विद्युत खांबाला जाऊन धडकल्याची घटना घडली आहे.  सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेतून ही महिला सुखरूप आहे. 

 

माध्यमांना मिळालेल्या माहिती नुसार अपघातग्रस्त महिला ही कोल्लमच्या (Kollam) आंचल भागात असणाऱ्या एका लॅब मधून घरी जाताना या महिलेला आपण कोरोना बाधित (Corona Positive) झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर झालेल्या या अपघातात (accident) महिलेच्या तोंडाला दुखापत झाली असून, सुदैवाने या घटनेत त्या महिलेचा जीव वाचला आहे. 

संबंधित बातम्या