Video राहूल गांधींनी ऑटोग्राफ देताच रडायला लागली मुलगी आणि....

Video राहूल गांधींनी ऑटोग्राफ देताच रडायला लागली मुलगी आणि....
While taking Rahul Gandhis autograph a girl started to crying Video Viral

पद्दुचेरी: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पद्दुचेरीला भेट दिली. तेथे त्यांनी मच्छीमार आणि शेतकर्‍यांशी संवाद साधला. त्याचबरोबर मभेत बोलत असतांना केंद्र सरकारवर निशाणा लगावला. यावेळी राहुल यांनी सरकारी महिला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या दौऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राहुल गांधींचा ऑटोग्राफ घेताना एका मुलीने रडायला सुरुवात केली. त्यानंतर राहूल गांधी यांनी त्या मुलीला जवळ घेत तिला शांत केले.

राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पद्दुचेरी येथे गेले होते. तीथे एका मुलीने त्यांना ऑटोग्राफ मागीतला, ती मुलगी त्यांचा ऑटोग्राफ घ्यायला आली. नेमकं तेवढ्यात राहुल गांधी यांनी ऑटोग्राफ देताच ती मुलगी भावूक झाली. आणि रडायला लागली.  राहुल यांनी त्या मुलीला जवळ घेतले तीला शांत केले. आणि तीच्याशी बोलून समजुत काढायला लागते. लोकांनी हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.

एका विद्यार्थ्याने "एलटीटीई (लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ एलाम) ने तुमच्या वडिलांचा जीव घेतला या लोकांबद्दल आपल्या काय भावना आहेत?" असा प्रश्न विचारला असता, "1991 मध्ये माझे वडील राजीव गांधी यांच्या हत्येमुळे मला खूप दुःख झाले होते. हिंसाचार आपल्यापासून काहीही काढून घेऊ शकत नाही. माझा कोणावरही राग किंवा द्वेष नाही. हे खरयं की मी माझ्या वडिलांना गमावले आणि तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. एखाद्याच्या हृदयाला त्याच्या शरीरापासून वेगळे करण्यासारखीच माझ्यासाठी ती  घटना होती. मला खूप दु:ख झाले पण मला कुणाचा द्वेष किंवा राग नाही, मी त्यांना माफ केले आहे." असे उत्तर राहुल गांधींनी काल बुधवारी त्या मुलीला दिले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Congress (@incindia)

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com