ब्लॅक फंगस पेक्षा व्हाईट फंगस अधिक जीवघेणा? वाचा सविस्तर 

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 21 मे 2021

कोविड 19 (Covid 19) साथीच्या दरम्यान ब्लॅक फंगस (Black Fungus) नंतर, आता पांढरी बुरशी (White Fungus) सारखा नवा आजार समोर आला आहे.  पांढऱ्या बुरशीला वैद्यकीय भाषेत कॅन्डिडा (Candida)  म्हणतात.

कोविड 19 (Covid 19) साथीच्या दरम्यान ब्लॅक फंगस (Black Fungus) नंतर, आता पांढरी बुरशी (White Fungus) सारखा नवा आजार समोर आला आहे.  पांढऱ्या बुरशीला वैद्यकीय भाषेत कॅन्डिडा (Candida)  म्हणतात. या बुरशीमध्ये फुफ्फुसांसह रक्तप्रवाहात प्रवेश करण्याची क्षमता असते. जेव्हा ही बुरशी रक्तापर्यंत पोहोचते तेव्हा त्याला कॅन्डिडेमिया (Candidia) म्हणतात, अशी माहिती  बनारस हिंदू विद्यापीठातील इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेजच्या न्यूरोलॉजी विभागातील डॉ. विजयनाथ मिश्रा यांनी दिली आहे.  (White fungus more deadly than black fungus? Read detailed)

Monsoon: मान्सून अंदमानात आला रे...

- पांढरी बुरशी सर्वाधिक धोकादायक का? 
पांढऱ्या बुरशीचा शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम होतो. ही बुरशी फुफ्फुसांपर्यंत पोहचली तर तिला फुफ्फुसांचा बॉल म्हणतात. सीटी स्कॅन तपासणी हे फुफ्फुसांमधील हे बॉल स्पष्ट दिसून येतात. कोविड 19 मुळे सर्वाधिक नुकसान फुफ्फुसांचे झाले आहे. ही पांढरी बुरशी देखील थेट फुफ्फुसांवर हल्ला करते. कोरोना रूग्णांमध्ये पांढऱ्या बुरशीचे निदान झाल्यास रुग्णांच्या मृत्यूचा धोका अधिक वाढू  शकतो.   पांढऱ्या बुरशीचा हा आजार मेंदू,  त्वचा, नखे, तोंडातील अंतर्गत भाग, पोट, मूत्रपिंड, आतडे यामध्येही  होऊ शकतो. यामुळे रुग्णांचे अवयव निकामी होऊन मृत्यू होऊ शकतो. जे रुग्ण ऑक्सिजन किंवा व्हेंटीलेटरवर आहेत, ज्या पकरणाद्वारे त्यांच्या शरीरात ऑक्सिजन जात आहे  त्यांची उपकरणे बॅक्टेरियामुक्त असणे अत्यंत गरजेचे आहे.  

ब्लॅक फंगस नंतर आता 'व्हाइट फंगस' चे नवे संकट

- नकारात्मक अहवाल का द्यावा?
पाटण्यात पांढऱ्या  बुरशीचे दोन रुग्णांचे कोविड 19 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.  त्याची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्यामुळे  पांढऱ्या बुरशीचा विषाणू त्यांच्या  नाकात पसरला.  नमुना स्वॅबमधून घेण्यात आला तेव्हा त्यात विषाणू आढळला नाही. अशा वेळी सिटी स्कॅनद्वारे वास्तविक संसर्गाची पुष्टी  करता येते.  याशिवाय नवजात मुलामध्येही पांढऱ्या बुरशीचा आजार  शक्य आहे. 

पांढरी आणि काळा बुरशी नवीन नाही. मात्र पांढर्‍या बुरशीमुळे छातीत संसर्ग होण्याचा धोका वाढतो. नवजात बाळकांमध्येही ही होऊ शकते. ज्या रूग्णांचे रॅपिड अँन्टीजेन आणि आरटी पीसीआर नकारात्मक आली आहे त्यानिदेखी; पांढऱ्या बुरशीची चाचणी  करून घ्यावी, असे  पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे विभागप्रमुख डॉ. सत्येंद्र नारायण सिंह यांनी म्हटले आहे. 
 
- काळ्या बुरशीपासून लक्षणे थोडी वेगळी आहेत
जर संक्रमण सांध्यापर्यंत पोहोचले तर आपल्याला सांधेदुखीसारखे वेदना, चालण्यात अडचण येते.

जेव्हा हे मेंदूपर्यंत पोहोचते तेव्हा त्या व्यक्तीची विचार करण्याची क्षमता, डोकेदुखी किंवा अचानक झटके येऊ लागतात. 

संसर्गाच्या एक ते दोन आठवड्यांत त्वचेवर  लहान आणि वेदनारहित गोल फोड जो उद्भवू लागतात. 

पांढर्‍या बुरशीमुळे  फुफ्फुस, खोकला, श्वास घेण्यात अडचण, छातीत दुखणे आणि ताप देखील पोहोचू शकतो.

संबंधित बातम्या