चीनला भारताची जमीन कोणी दिली? राहुल गांधींनी विचारावा आपल्या आजोबांना प्रश्न
Who gave the land of India to China Rahul Gandhi should ask his grandfather a question

चीनला भारताची जमीन कोणी दिली? राहुल गांधींनी विचारावा आपल्या आजोबांना प्रश्न

नवी दिल्ली:  पूर्व लडाखच्या पॅंगॉंग सरोवराच्या भागातून सैन्य मागे  घेण्याची प्रक्रीया सुरु  झाली असताना कॉंग्रेस  नेते  राहुल  गांधी  यांनी  पंतप्रधान  नरेंद्र  मोदी  यांच्यावर  हल्लाबोल केला. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक असून ते चीनचा सामना करण्यात अपयशी ठरले आहेत. अशी टिका शुक्रवारी मोदी यांच्यवर केली. पंतप्रधान भारतीय भूमीचे रक्षण करण्य़ाची जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडू शकले नाहीत. ते डरपोक असून आपल्या सैनिकांच्या बलिदानाचा त्यांनी विश्वासघात केला आहे.'' असा आरोप राहुल गांधीनी केला.

भारत- चीन  सीमावादाचा  मुद्दा  राजकीय  वर्तुळात  चांगलाच  रंगला  आहे. राहुल  गांधी यांनी  केलेल्या आरोपांना केंद्रीय  गृहराज्यमंत्री  जी. किशन  रेड्डी  यांनी  पलटवार  केला आहे.‘’भारताची भूमी चीनला कोणी दिली ? हे  कॉंग्रेस  नेत्यांने आपल्या आजोबांना विचारावे  त्यांना त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. कोण देशभक्त हे कोण नाही हे त्यांना चांगलच समजेल. लोकांना सर्व  काही माहित आहे.'' असे  रेड्डी म्हणाले. तसेच  केंद्रीय मंत्री आर. के. सिंह  यांनीही  राहुल  गांधी  यांच्यावर हल्लाबोल केला. ''राहुल यांच्या विधानावरुन असंसदीयपणा आणि अपरिपक्वतेचा अभाव दिसून येतो आहे. त्यांना काही समजत नाही आणि ते समजून घेण्याचा बिलकुल प्रयत्न करत नाहीत.''

भारताची  सीमा  पॅंगॉंग सरोवराच्या फिंगर  फोर पर्यंत असताना भारतीय सैन्याला  फिंगर तीन  पर्यंत  का जाण्यास सांगण्यात आले असा सवाल राहुल गांधी  यांनी  उपस्थित केला होता. रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या देसपांग  या  भागाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ  सिंग यांनी एक शब्द ही  उच्चारला नाही. देसपांगच्या भागात  सुध्दा  चीनी  सैनिकांनी आक्रमण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची भूमी चीनला दिली आहे. याच्याबद्द्ल त्यांनी भारतीय जनतेला उत्तर दिले पाहिजे असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com