Health Care Tips: 'या' कारणामुळे कोट्यवधी लोकांचे कमजोर होतंय हृदय, WHOने दिला इशारा

ट्रान्स फॅट हे खाद्यतेलामध्ये आढळणारी एक प्रकारची चरबी आहे जी हृदयरोगांना निमंत्रण देते.
Heart Disease
Heart DiseaseDainik Gomantak

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की अनेक प्रयत्न करूनही ट्रान्स फॅटच्या सेवनामुळे जगातील पाच अब्ज लोकांना अजूनही ह्रदयविकाराचा धोका आहे. हे विषारी पदार्थ लोकांच्या आवाक्याबाहेर काढण्यात अपयशी ठरलेल्या देशांना आवाहन करताना डब्ल्यूएचओने हे सांगितले.

  • धोक्याची जाणीव होतांतच WHO ने दिले आदेश

2018 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने 2023 पर्यंत जगभरातील कारखान्यांमध्ये बनवलेल्या फॅटी ऍसिडचे उच्चाटन करण्याचे आवाहन जारी केले होते. कारण WHO ला असे आढळले होते की गेल्या काही वर्षांमध्ये दरवर्षी सुमारे अर्धा दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला.

युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सीने म्हटले आहे की एकूण 2.8 अब्ज लोकसंख्या असलेल्या 43 देशांनी याला दूर करण्यासाठी उत्कृष्ट धोरणे राबवली असली तरीही आपल्या जगातील पाच अब्जाहून अधिक लोक या धोकादायक विषाचे सेवन करत आहेत.

Heart Disease
Ganesh Jayanti 2023: आज माघी गणेश जयंतीच्या दिवशी असे करा बाप्पाला प्रसन्न!
cooking
cookingDainik Gomantak
  • ट्रान्स फॅट म्हणजे काय

ट्रान्स फॅट एक प्रकारचे असंतृप्त फॅटी ऍसिड आहे. याचा आपल्या आरोग्यास धोका नाही. परंतु जेव्हा ते कारखाण्यात तयार केले जाते आणि अन्न म्हणून वापरले जाते तेव्हा ते स्लो पॉयझन बनते. वनस्पती तेलामध्ये हायड्रोजन टाकून ट्रान्स फॅट तयार केले जाते ज्यामुळे ते अधिक घन बनते आणि पदार्थांचे शेल्फ लाइफ वाढते.

वनस्पती तेलात धोकादायक ट्रान्स फॅट असते. पदार्थांमध्ये वापरण्यात येणारे हे तेल हृदयाच्या धमन्या बंद करते. चिप्स, बेक केलेले पदार्थ जसे की कुकीज, केक, स्वयंपाकसाठी वापरले जाणारे तेल आणि बरेच काही यासारख्या पॅकेज केलेल्या पदार्थांमध्ये वापरले जाते.

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अॅडनॉम गेब्रेहेसुस यांनी या मुद्द्यावर प्रसिद्ध झालेल्या अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, "ट्रान्स फॅट हे एक विषारी रसायन आहे जे मानवांना मारते आणि अन्नामध्ये स्थान नसावे." आपण सर्वांनी यातून सुटका करण्याची वेळ आली आहे. ते म्हणाले की, ट्रान्स फॅट असलेले पदार्थ धोकादायक असतात. त्यामुळे अनेक आजारांना बळी पडू शकतो.

Health care tips
Health care tipsDainik Gomantak

डब्ल्यूएचओ ने त्वरित कारवाई करण्याचे केले आवाहन

अन्न उत्पादक हे ट्रान्स फॅट वापरतात. कारण त्याचे शेल्फ लाइफ जास्त असते. तसेच ते स्वस्त देखील असते. ट्रान्स फॅटचे उच्चाटन करण्यासाठी एकतर हायड्रोजनेटेड तेलांच्या उत्पादनावर किंवा वापरावर देशव्यापी बंदी, ट्रान्स फॅटचा एक प्रमुख स्रोत, किंवा सर्व खाद्यपदार्थांमध्ये एकूण चरबीच्या 100 ग्रॅममध्ये फक्त दोन ग्रॅम ट्रान्स फॅटची मर्यादा अनिवार्य केली जावी.

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की हृदयविकाराचा (Heart) उच्च धोका असलेल्या 16 देशांपैकी ट्रान्स फॅटमुळे नऊ देशांनी अद्याप या दिशेने कोणतेही ठोस पावले उचललेली नाहीत.

या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, अझरबैजान, भूतान, इक्वेडोर, इजिप्त, इराण, नेपाळ, पाकिस्तान आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश आहे.

डब्ल्यूएचओचे पोषण आणि अन्न सुरक्षा संचालक, फ्रान्सिस्को ब्रँका यांनी या देशांना तातडीची कारवाई करण्याचे आवाहन केले.

  • ट्रान्स फॅटच्या विरोधात भारताची काय परिस्थिती आहे?

जगातील साठ देशांनी ट्रान्स फॅटच्या विरोधात धोरणे आखली आहेत. ज्यात 3.4 अब्ज लोकांचा समावेश आहे, जे जगातील लोकसंख्येच्या सुमारे 43 टक्के आहे. यामध्ये 43 देश ट्रान्स फॅट विरुद्ध सर्वोत्तम धोरणे राबवत आहेत. या देशांमध्ये प्रामुख्याने युरोप आणि अमेरिका आणि उत्तर अमेरिकन देश आहेत. तसेच ही धोरणे कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये स्वीकारली जाणे बाकी आहे. भारत, अर्जेंटिना, बांगलादेश, पॅराग्वे, फिलीपिन्स आणि युक्रेनसह अनेक मध्यम उत्पन्न देशांनीही ही धोरणे स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com