कोण होणार भारताचा पुढील राष्ट्रपती? विधानसभा निवडणुकांनंतर चर्चेला उधाण

उत्तर प्रदेशासह (Uttar Pradesh) चार राज्यांतील विधानसभा निवडणुकानंतर देशाच्या पुढील राष्ट्रपतीपदाची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे.
Rashtrapati Bhavan
Rashtrapati BhavanDainik Gomantak

Presidential Election 2022 : उत्तर प्रदेशासह चार राज्यांतील विधानसभा निवडणुकानंतर देशाच्या पुढील राष्ट्रपतीपदाची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे. सध्याच्या निवडणूक निकालांनी राज्यसभेतील (Rajya Sabha) सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची स्थितीही मजबूत झाली आहे. यातच आता यंदाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संख्याबळाच्या बाबतीतही त्यांची स्थिती चांगली सुधारली आहे. (Who will be the next President of India After the assembly elections the discussion started)

दरम्यान, भारताच्या राष्ट्रपतींची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते. या इलेक्टोरल कॉलेजमध्ये लोकसभा आणि राज्यसभेतील 776 खासदार आणि विविध राज्यांतील एकूण 4120 आमदारांचा समावेश आहे. एकूण इलेक्टोरल कॉलेजचे संख्याबळ 10,98,903 मते असून भाजपचे एकूण संख्याबळ 50 टक्क्यांहून अधिक आहे. प्रत्येक खासदाराच्या मताचे संख्याबळ 708 आहे. आमदारांच्या बाबतीत राज्ये ठरवतात. यूपीमध्ये प्रत्येक आमदाराचे मत संख्या 208 आहे.

Rashtrapati Bhavan
'भाजपनं दिवास्वप्न पाहणं थांबवावं', ममता बॅनर्जी भाजपवर बरसल्या

तसेच, देशातील सर्वात मोठे राज्य यूपीसह चार राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळाली आहे. यूपीमध्ये भाजपच्या या विक्रमी विजयाचा 31 मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुका आणि जुलैमध्ये होणाऱ्या संभाव्य राष्ट्रपती निवडणुकीवर परिणाम होणार आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी यूपीमध्ये 273 जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे पुढच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान झाले तर विजय मिळवण्यास कोणतीही अडचण येणार नाही. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांचे नाव या सर्वोच्च पदासाठी आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. परंतु विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना दुसरी टर्म ऑफर करायची की नाही यावर भाजप नेतृत्वाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

Rashtrapati Bhavan
ममता बॅनर्जी मुंबईत यात गैर काय ?, सामनातून सेनेचे भाजपवर ताशेरे

शिवाय, आतापर्यंत देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनाच दोन टर्मचा कार्यकाळ मिळाला आहे. या प्रकरणी सखोल विचार करण्याची गरज असून शेवटी राष्ट्रपती भवनासाठी सर्वात योग्य व्यक्ती कोण असेल याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) घेतील, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र अजून बरेच दिवस आहेत. परंतु सरकारला या प्रकरणी मित्रपक्षांना विश्वासात घेऊन इतर पक्षांचा पाठिंबा घ्यायचा आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, पुढचा राष्ट्रपती ठरवण्यात ते अतिशय सहज आणि निर्णायक भूमिकेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com