Exit Poll 2023: नागालँड, त्रिपुरा, मेघालयात कुणाची सत्ता येणार, जाणून घ्या एक्झिट पोलचे अंदाज...

विधानसभा निवडणुकीचा 2 मार्च रोजी निकाल
Meghalaya Tripura Nagaland Exit Poll 2023
Meghalaya Tripura Nagaland Exit Poll 2023Dainik Gomantak

Meghalaya Tripura Nagaland Exit Poll 2023: मेघालय आणि नागालँडमध्ये आज, सोमवारी (27 फेब्रुवारी) मतदान झाले तर यापूर्वी 16 फेब्रुवारीला त्रिपुरामध्ये मतदान झाले होते. तिन्ही राज्यांतील निवडणुकांची रणधुमाळी संपली आहे. तिन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले आहे.

आता 2 मार्चला लागणाऱ्या निकालाची सर्वांना प्रतीक्षा आहे. तत्पुर्वी तीन राज्यांचे एक्झिट पोल आले असून त्यातून ईशान्य भारतातील या राज्यांमध्ये कुणाची सत्ता येणार याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Meghalaya Tripura Nagaland Exit Poll 2023
Rohan Khaunte: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक अवमानप्रकरणी पर्यटन मंत्री रोहन खंवटेंकडून सारवासारव; म्हणाले...

नागालँड

झी न्यूज-मॅट्रिझच्या एक्झिट पोलने नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी युतीला 35-43 जागांसह मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. काँग्रेसला सुमारे एक ते तीन जागा आणि एनपीएफला दोन ते पाच जागा मिळू शकतात.

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, नागालँडमधील 60 जागांपैकी भाजप-एनडीपीपी युतीला 38-48 जागा मिळू शकतात. एनपीएफला 3 ते 8 जागा, काँग्रेसला 1 ते 2 जागा आणि इतरांना 5 ते 15 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

एक्झिट पोलनुसार भाजप-एनडीपीपी युतीला 49 टक्के मते मिळत आहेत. एनपीएफला 13 टक्के, काँग्रेसला 10 टक्के आणि इतरांना 28 टक्के मते मिळत आहेत. टाईम्स नाऊ ईटीजी एक्झिट पोलनुसार, भाजपा-एनडीपीपीला 39-49 जागा, एनपीएफला 4-8 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

जन की बातनुसार, भाजप-एनडीपीपी युतीला 35-45 जागा, एनपीएफला 6-10 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला एकही जागा दिसत नाही. या चारही एक्झिट पोलनुसार भाजप-एनडीपीपीला 42, काँग्रेसला 1, एनपीएफला ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

त्रिपुरा

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, त्रिपुरामध्ये 60 जागांपैकी भाजपला 36-45 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. टीएमपीला 9 ते 16 जागा मिळताना दिसत आहेत. डाव्या पक्षांना 6 ते 11 जागा मिळतील तर इतर पक्षांना एकही जागा मिळणार नाही.

झी न्यूज-मॅट्रिझ एक्झिट पोलनुसार त्रिपुरामध्ये भाजपला 29 ते 36 जागांसह पुनरागमनाचा अंदाज वर्तवला आहे.

एक्झिट पोलनुसार त्रिपुरामध्ये भाजपला 45 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. डावे पक्ष + काँग्रेसला 32 टक्के, टिपरा मोथा पक्ष + सहकाऱी पक्षांना 20 टक्के आणि इतरांना 3 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

टाईम्स नाऊ ईटीजी एक्झिट पोलनुसार, भाजपला 21-27 जागा मिळतील, डाव्यांना 18-24 जागा मिळतील. जन की बातनुसार, भाजपला 29-40 जागा मिळतील, तर डाव्यांना 9-16 जागा मिळतील. या चारही एक्झिट पोलनुसार भाजपला 32 हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे, डावे + काँग्रेसला 15 जागा मिळण्याची शक्यता आहे.

Meghalaya Tripura Nagaland Exit Poll 2023
Delhi Deputy CM Manish Sisodia: मनीष सिसोदियांना न्यायालयाने सुनावली 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी

मेघालय

झी न्यूज-मॅट्रिझ एक्झिट पोलमध्ये एनपीपीला 21 ते 26 जागा, भाजपला 6 ते 11 जागा, टीएमसीला 8 ते 13 जागा, काँग्रेसला 3 ते 6 जागा आणि इतरांना 10 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, एनपीपीला 18 ते 24 जागा, भाजपला 4 ते 8 जागा, काँग्रेसला 6 ते 12 जागा, टीएमसीला 5 ते 9 जागा आणि इतरांना 4 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

एक्झिट पोलनुसार, एनपीपीला 29 टक्के, काँग्रेसला 19 टक्के, भाजपला 14, टीएमसीला 16 आणि इतरांना 11 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

जन की बातनुसार, एनपीपीला 11 ते 16 जागा, भाजपला 3 ते 7 जागा, काँग्रेसला 6 ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. या चारही एक्झिट पोलनुसार एनपीपीला 20, काँग्रेसला 6, भाजपला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com