Bihar elections: राहूल द्रविडला फक्त २०४च मते...

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

जीरादेई (सीवान) या विधानसभा मतदारसंघातून एक उमेदवार उभा आहे. ज्याची परिसरात मोठ्या उमेदवारांपेक्षाही जास्त चर्चा होत आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या या उमेदवाराचे नाव अजब आहे. 

पाटणा-  जीरादेई (सीवान) या विधानसभा मतदारसंघातून एक उमेदवार उभा आहे. ज्याची परिसरात मोठ्या उमेदवारांपेक्षाही जास्त चर्चा होत आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या या उमेदवाराचे नाव राहूल द्रविड असे असून भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू राहूल द्रविड याच्या नावाशी साम्य असल्याने या उमेदवाराची ही चर्चा होत  आहे.

 या मतदारसंघात सीपीआय(एमएल)(एल)चे अमरजीत कुशवाहा १२,००३ मताधिक्य घेऊन आघाडीवर आहेत. त्यांना जदयूच्या कमला सिंह यांच्याकडून कडवे आव्हान मिळत असून कमला यांना आतापर्यंत ८८४१ मते मिळाली आहेत. लोक जनशक्ति पार्टीचे विनोद तिवारी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना १००० मते मिळाली आहेत. राहूल द्रविड याला मात्र त्याच्या नावाच्या चर्चेचा उपयोग करून मते घेण्यात अपयश आले. त्याला २०४ एवढीच मते आतापर्यंत मिळवता आली आहेत.  

   जीरादेई (सीवान) मतदारसंघाचा इतिहास- 

2015 मध्ये जदयूचे रमेश सिंह कुशवाहा येथून निवडून आले होते. त्यांना 40 हजार 760 इतके मताधिक्य मिळाले होते. त्यांनी भाजपच्या उमेदवार आशादेवी यांचा 6091 मतांनी पराभव केला होता. आशादेवी यांना त्यावेळी 36 हजार 669 मते मिळाली होती.  

 त्याआधी 2010मध्ये आशादेवी यांनी निवडणूक जिंकून सीपीआय (एमएल)च्या अमरजीत कुशवाहा यांचा पराभव केला होता. त्यांनी कुशवाहा यांना 8920 मतांनी पराभूत केले होते. आशादेवी यांना 29, 442 मते मिळाली होती. तर अमरजीत यांना 20, 522 मते मिळाली होती.  
 

संबंधित बातम्या