निवडणूका आणि कुंभमेळा ठरले कोरोना स्प्रेडर? WHO चे स्पष्टीकरण

दैनिक गोमंतक
गुरुवार, 13 मे 2021

भारतात कोरोनाचा बी.1.617 प्रकार पहिल्यांदा ऑक्टोबर 2020 मध्ये समोर आला होता असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) झपाट्याने वाढत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे मागील काही काळात झालेल्या निवडणूका आणि धार्मिक कार्यक्रम असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालात म्हटले गेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिलेल्या अहवालात म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघनेने भारतातील कोणत्या कार्यक्रमाचे नाव घेतले नाही. परंतू, काही धार्मिक आणि राजनीतिक कार्यक्रमासाठी एकत्र येणे कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला कारणीभूत ठरले आहे.    

कोरोनाचा संसर्ग पाण्यातून होत नाही

भारतात कोरोनाचा बी.1.617 प्रकार पहिल्यांदा ऑक्टोबर 2020 मध्ये समोर आला होता असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. भारतातील कोरोना रुग्णसंख्या आणि मृतांचे वाढलेले आकडे यामध्ये बी. 1.617 आणि बी.1.1.7 सारखे प्रकार असल्याचे म्हटले आहे. यावरून अनेक वेगवेगळी मते आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या साप्ताहिक अपडेटमध्ये असे म्हटले आहे की भारतातील कोरोना पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) नमुन्यांपैकी 0.1 टक्के नमुने इनिशिएटिव ऑन शेयरिंग ऑल इन्फ्लूएन्जा डेटा वरती क्रमवारीत केले गेले होते. जेणेकरुन कोरोनाचा कोणता प्रकार आहे शोधता येतील. बी.1.1.7 आणि बी.1.612 सारख्या अनेक प्रकारांमुळे भारतातील कोरोनाचे प्रमाण वाढल्याचे उघड झाले. 

कोरोनाच्या बी.1.617 प्रकारची (Coronavirus Variant) जास्त वाढ 
डब्ल्यूएचओच्या मते, एप्रिलच्या अखेरीस, भारतातील 21 टक्के कोरोना रुग्णांमध्ये बी .1.617.1 चा प्रकार आढळला आणि 7 टक्के रुग्णांमध्ये बी 1.617.2 प्रकार होता. या दोन्ही प्रकारांचा वाढीचा दर इतर प्रकारांच्या तुलनेत खूपच जास्त असल्याचेही समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या  म्हणण्यानुसार, भारत नंतर ब्रिटनमध्ये सर्वाधिक बी .1.617 चे रुग्ण आढळले आहेत.

चेन्नईचा नवा पॅटर्न देतोय कोरोनाला टक्कर!

जगातील 50 टक्के रुग्ण भारतातील
जगभरात कोरोनाच्या स्थितीबद्दल, जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की गेल्या आठवड्यात नवीन रुग्णांमध्ये आणि संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये किंचित घट झाली आहे. या काळात 55 लाख नवीन रुग्ण आढळले आणि 90,000 लोकांना आपला जीव गमवावा लागला. जगभरातील एकूण रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण भारतात आढळले तर 30 टक्के मृत्यू भारतात झाले आहेत. गेल्या आठवड्यात, दक्षिण-पूर्व आशियातील एकूण प्रकरणांपैकी 95 टक्के रुग्ण भारतातील आहेत आणि एकूण मृत्यूंपैकी 93 टक्के मृत्यू भारतात झाले आहेत.

संबंधित बातम्या