Instagram Down: भारतात इंस्टाग्राम का गंडलं...?

तांत्रिक अडचणीबाबत इन्स्टाग्रामकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
Instagram Down
Instagram DownDainik Gomantak

नवी दिल्ली: फेसबुकची (Facebook) मालकी असलेल्या इंस्टाग्राम (Instagram Down) ॲपची सेवा भारतासह (India) अनेक देशांत काल ठप्प पडली. भारतातील यूजर्सना इन्स्टाग्राम (Instagram Users)वापरताना अडचणीत येत असल्याचे निदर्शनास आले आहे. आयओएस आणि अँड्राईडचे यूजर इन्स्टाग्रामचा वापर करू शकत नसल्याचे निष्पन्न झाले. यादरम्यान, फेसबुक, व्हॉटसअपची सेवा सुरळीत राहिली. या तांत्रिक अडचणीबाबत इन्स्टाग्रामकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

ॲप सेवेसंदर्भात अडचणी जाणून घेण्याचे काम करणाऱ्या डाउन डिटेक्टरने देखील इन्स्टाग्रामची सेवा डाउन झाल्याचे म्हटले आहे. डाउनडिटेक्टरवर 46 टक्के यूजरनी मोबाईल ॲपच्या अडचणीवरून, 31 टक्के यूजरनी संकेतस्थळ आणि 24 टक्के यूजरनी इन्टाग्रामच्या सर्व्हर कनेक्शनबाबत तक्रारी केल्या. आतापर्यंत अडीच हजाराहून अधिक तक्रारी डाउनडिटेक्टरकडे आल्या आहेत. डाउनडिटेक्टरनने म्हटले की, भारतातील यूजरना सकाळी 11 च्या सुमारास आयओएस आणि ॲड्राईड या दोन्ही प्लॅटफॉर्मवर अडचणी येऊ लागल्या. त्यानंतर तक्रारीचा ओघ वाढला. इन्स्टाग्रामची सेवा डाउन झाल्याबद्दल यूजर ट्विटरवर सतत ट्‌विट करत आहेत.

Instagram Down
न्यूयॉर्कमध्ये 'इडा' चे थैमान, 41 जणांचा दुर्दैवी मृत्यू

इंस्टाग्रामला भारत आणि जगाच्या इतर काही भागांमध्ये समस्या येत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक योग्य प्रकारे चालत असतांना फक्त इन्स्टाग्राममध्येच अडचणी येत असल्याचं निदर्शनास आलं होतं.

डाऊनडेक्टर या वेबसाईटच्या मते, 2 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11:02 च्या सुमारास भारतात इंस्टाग्रामला समस्यांना सामोरे जावे लागत आहे. इंस्टाग्राम वेबसाइटवर सुमारे 45 टक्के इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी तक्रार केली आहे तर 33 टक्के वापरकर्त्यांना इन्स्टाग्राम वेबसाइटवर समस्या येत आहेत. उर्वरित 22 टक्के वापरकर्ते असा दावा करतात की ते सर्व्हर कनेक्शन समस्यांकडे लक्ष देत आहेत. आत्तापर्यंत, 1,000 हून अधिक वापरकर्त्यांनी वेबसाइटवर या समस्येची तक्रार केली आहे. इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनी त्याबद्दल ट्विट करण्यास सुरवात केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com