मराठी लोकांवर बेळगावमध्ये हल्ल्यांबाबत पंतप्रधान,गृहमंत्री गप्प का? - संजय राऊत

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 13 मार्च 2021

कोल्हापूरमध्ये कर्नाटकच्या बसेसना बंदी घालण्यात आली आहे.

मुंबई : बेळगावमध्ये महाराष्ट्र- कर्नाटक वाद पुन्हा चिघळला असल्याचे दिसत आहे. बेळगाव येथील कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या काही कार्यकर्त्य़ांकडून शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. एवढच नाही तर त्यांच्या गाडीवरील भगवा ध्वजही काढण्यात आला आहे. आणि गाडीवरील भगव्या फलकास काळे फासण्याचाही प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत शिवसेनेकडूनही प्रतिक्रिया आली आहे. कोल्हापूरमध्ये कर्नाटकच्या बसेसना बंदी घालण्यात आली आहे. या वादामुळे सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झालेले पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया दिली आहे, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री, अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला आहे.

महाराष्ट्र लॉकडाउन: आज सकाळपासूनच या जिल्ह्यामध्ये संपूर्ण लॉकडाउन

राऊत म्हणाले, ''ज्या प्रकारे बेळगावमध्ये कर्नाटक भाजप्रणित एक संघटना आहे, ते आमच्या मराठी लोकांवर ज्याप्रकारे हल्ला करत आहेत. आमच्या शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहेत. हे अत्यंत चिंताजनक आहे. भाजपला किंवा केंद्र सरकारला पश्चिम बंगालमध्ये जो हिंसाचार चालु आहे त्याबद्दल त्यांना खूप चिंता आहे. मात्र कर्नाटकामधील बेळगावमध्ये आठ दिवसांपासून आमच्या लोकांवर ज्या प्रकारे हल्ले सुरु आहेत, हा खुनी खेळ सुरु आहे. त्याबाबतीत कोणताही भाजपचा नेता, केंद्रीय गृहमंत्री किंवा पंतप्रधान बोलताना दिसत नाहीत.''

 

''तिथ आमच्या लोकांची बेळगावमध्ये डोकी फुटत असतील, तर आम्हीही हातात दंडूक घ्यावे का? आम्ही देखील जशाच तसे उत्तर द्यावे का? हा देशाचा अंतर्गत मुद्दा आहे, हा काही भारत- पाकिस्तानचा मुद्दा नाही. जर पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप केल्यास हा दोन राज्यामधील मुद्दा शांततापूर्ण पध्दतीने संपू शकतो. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे मागणी करतो की, आपल्या लोकांना बळ देण्यासाठी सर्वपक्षीय प्रतीनिधीमंडळ बेळगावला जायला हवं.'' असं देखील राऊत यावेळी म्हणाले. 

 

संबंधित बातम्या