वाट माझी बघतोय रिक्षावाला... म्हणत कोट्याधीशाची पत्नी सैराट

प्रश्न प्रेमाचा असेल तर मग लोकं काय करतील याचा अंदाज लावणे कठीणच
Auto rickshaw
Auto rickshawDainik Gomantak

आपल्या देशात कधी काय घडेल ते सांगताच येत नाही. त्यातला त्यात प्रश्न प्रेमाचा असेल तर मग लोकं काय करतील हेही सांगता येत नाही. प्रेमासाठी वाट्टेल ते करणारे प्रेमासाठी वेडे होणारे लोकं या जगात आहे त्यामुळे प्रेम मिळवण्यासाठी कोण काय करेल यांचा अंदाज लावणे तर आवाहनच आहे.

अशीच एक घटना मध्य प्रदेशमधील इंदूर शहरामध्ये घडली आणि त्यातून एक विचित्र प्रकार समोर आला. इंदूर मधील एका कोट्याधीशाची पत्नी रिक्षावाल्याबरोबर पळून गेली. विशेष म्हणजे हा रिक्षावाला या महिलेपेक्षा तब्बल 13 वर्षांनी लहान आहे.

Auto rickshaw
Leprosy Free India Campaign: कुष्ठरोग आभियानाचा पंतप्रधान मोदींनी केला प्रारंभ

हा सर्व प्रकार 13 ऑक्टोबर रोजी इंदूर शहरातील खाजराना परिसरामध्ये घडला. मात्र या घटनेच्या दोन आठवड्यानंतर पतीने पोलिसांकडे आपली पत्नी गायब असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर यासंदर्भातील वास्तविक घटनेचा खुलासा झाला. पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार कोट्यावधीचा मालक असणाऱ्या उद्योगपतीने पोलिस ठाण्यात केली. पतीने तक्रार करतांना पत्नी घरातून पळून जाताना सोबत 47 लाख रुपये घेऊन गेल्याचेही म्हटले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार हा रिक्षावाला नियमित या महिलेला घरी सोडायचा त्यामुळे तो तिच्या ओळखिचा झाला होता. ही महिला 13 ऑक्टोबर रोजी रिक्षातून घराबाहेर गेली ती घरी परत आलीच नाही. त्यानंतर करोडपती व्यक्तीला त्याच्या घरातील ४७ लाख रुपयांची रोख रक्कमही जागेवर नसल्याचं दिसून आलं. आणि तेव्हाच त्याला पत्नी पळून गेल्याची शंका आली. या उद्योगपतीकडे मोठ्याप्रमाणात शेतजमीन असल्याने तो घरामध्ये बरेचदा पैसे ठेवायचा अशी माहिती समोर येत असल्याचं एका स्थानिक प्रसार माध्यमांच्या हवाल्याने सांगितले आहे. सध्या इंदूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या उद्योगपतीची पत्नी आणि रिक्षाचालकाचा शोध घेत आहे.

Auto rickshaw
17 वर्षीय मुलीने बाळाला जन्म देत स्वतःच कापली गर्भाची नाळ

प्राथमिक तपासामध्ये मिळालेल्या माहितीनुसार या रिक्षा चालकाचं नाव इम्रान असल्याची माहिती समोर आली आहे. तो 32 वर्षांचा असून यापूर्वी तो खांडवा, जावरा, उज्जैन आणि रतलाचा रहिवासी राहिला आहे. त्याचे वास्तव्य असलेल्या सर्व ठिकाणी पोलिसांनी छापेमारी सुरु केली असून ते या दोघांचा शोध घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे इम्रानच्या ओळखीच्या लोकांच्या घरी छापेमारी सुरु असतानाच त्याच्या एका मित्राच्याच घरी 33 लाखांची रोख रक्कम सापडली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com