CBSE 9 वी आणि 11 वी च्या विध्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका तयार करेल का?
CBSE Board Dainik Gomantak

CBSE 9 वी आणि 11 वी च्या विध्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका तयार करेल का?

मंडळ सर्वप्रथम आपल्या वेबसाईटवर (website)सर्व माहिती प्रसिद्ध करते. त्यामुळे केवळ मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहिती प्रमाणित आहे.

सोशल मीडियावर (Social media)एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा म्हटले आहे की 9 वी आणि 11 वीच्या अंतिम परीक्षांची प्रश्नपत्रिका सीबीएसई तयार करेल.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) 9 वी आणि 11 वीच्या प्रश्नपत्रिका तयार करेल का? अशा गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. '9 वी आणि 11 वीच्या अंतिम परीक्षांची प्रश्नपत्रिका सीबीएसई तयार करेल असा दावा केला आहे'.

सीबीएसईने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. सीबीएसईने 9 वी आणि 11 वीच्या अंतिम परीक्षांसाठी (Examination)प्रश्नपत्रिका तयार केल्याचा दावा करणारा संदेश 'बनावट' आहे.

CBSE Board
केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारात 'या' राज्याला सर्वाधिक प्रतिनिधीत्व

मंडळानेही माहिती दिली :

बोर्डाने (Board)अशा अफवांना नाकारले आहे. त्यावर असे म्हटले आहे की “हे लक्षात आले आहे की सीबीएसई इयत्ता नववी आणि अकरावीच्या प्रश्नपत्रिका प्रदान करेल. या संदर्भात, हे स्पष्ट केले आहे की ही बनावट बातमी आहे आणि सीबीएसईच्या अजेंडामध्ये अशी कोणतीही योजना नाही. याचा अर्थ असा की बोर्ड या वर्गांसाठी प्रश्नपत्रिका तयार करणार नाही.

बोर्डाने म्हटले : पुन्हा सांगितले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये. मंडळ सर्वप्रथम आपल्या वेबसाईटवर सर्व माहिती प्रसिद्ध करते. त्यामुळे केवळ मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहिती प्रमाणित आहे

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com