पाकिस्तान मध्ये होणाऱ्या 'पब्बी अँटी टेरर 2021' मध्ये भारत सहभागी होणार ?

Indian Army.jpg
Indian Army.jpg

जगातल्या वेगवगेळ्या देशांतले परस्पर संबंध सुधारण्यासाठी किंवा दृढ होण्यासाठी अनेक देश सामूहिक सैन्य अभ्यास कार्यक्रम आयोजित करत असतात. त्याच अनुशंघाने  शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनने यावर्षी पाकिस्तान मध्ये सामूहिक युद्धाभ्यासाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. वर्षाच्या अखेरीस शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) ने पाकिस्तानमध्ये आयोजित केलेल्या बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यासात भाग घेण्याचा कोणताही प्रस्ताव भारतीय लष्कराला अद्याप मिळालेला नाही, अशी माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. या सैन्य अभ्यास कार्यक्रमाला 'पब्बी-अँटी टेरर 2021' असे नाव देण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या एससीओ अभ्यासात भाग घेण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप आपल्याला मिळालेला नसल्याची माहिती सैन्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.(Will India participate in Pabbi-Anti-Terror 2021 in Pakistan ?)  

भारतीय सैन्य 'पब्बी-अँटी-टेरर 2021' (Pabbi-Anti-Terror 2021) या अभ्यासात भाग घेणार का यावर आता  जगाचे लक्ष लागून आहे. शांघाय संघटनेची स्थापना 2001 मध्ये रशिया, चीन, किर्गिस्तान, कझाकस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या राष्ट्रपतींनी शांघाय येथे झालेल्या शिखर परिषदेत केली होती. 2005 मध्ये या गटात निरीक्षक म्हणून भारत आणि पाकिस्तानचा समावेश होता तर 2017 मध्ये दोन्ही देश शांघायचे (shanghai summit) पूर्ण सदस्य झाले. 

यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पब्बी नोहशेरा जिल्ह्यात हा लष्करी अभ्यास करण्याची योजना आखण्यात आली आहे. या अभ्यासाचा उद्देश शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन सदस्य देशांमधील परस्पर सहकार्य वाढवणे असा आहे. पाकिस्तानी माध्यमांनी शुक्रवारी आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारताला (India) आमंत्रण दिले जाईल की नाही याबाबत अद्याप पाकिस्तानच्या बाजूने कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान ‘डॉन’ (Don) या पाकिस्तानी वृत्तपत्राने एका सैन्य अधिकार्‍याच्या हवाल्याने सांगितले की, भारतीय सैन्य (Indian Army) दलाला आमंत्रित करण्याचे अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही.

तर, या वर्षाच्या शेवटी पाकिस्तानमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) च्या नियोजित बहुराष्ट्रीय अभ्यासात भाग घेण्याचा कोणताही प्रस्ताव भारतीय लष्कराला अद्याप मिळालेला नसल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय सैन्य पाकिस्तान मध्ये होणाऱ्या भाग घेईल की नाही याबद्दल चर्चा सुरु होती. आणि या चर्चेवर भारतीय सैन्यानेच स्पष्टीकरण देताना, अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव पाकिस्तानकडून मिळाला नसल्याचे म्हटले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com