भारतासाठी द्वार अजूनही खुले

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

परिषदेपूर्वी जपानचे पंतप्रधान योशिहीदे सुगा यांनी भारत करारासाठी परतेल तसेच इतर देश पाठिंबा देतील अशी आशा व्यक्त केली.

मुंबई : या कराराच्या तपशिलावरून अखेरचा हात फिरविला जात असताना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारताने माघार घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा निर्णय इतर सदस्यांसाठी आकस्मिक ठरला होता. असे असले तरी भारतासाठी द्वार अजूनही खुले असल्याचे समूहाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. बाजारपेठ खुली करण्याच्या गरजेसाठी स्थानिक पातळीवर तीव्र विरोध निर्माण झाल्यामुळे भारताने माघार घेतली. शेतकरी आणि उद्योगांसमोर परदेशी मालाच्या स्पर्धेचे आणखी मोठे आव्हान निर्माण होऊ नये यासाठी माघार घेतल्याचे मानले जाते. परिषदेपूर्वी जपानचे पंतप्रधान योशिहीदे सुगा यांनी भारत करारासाठी परतेल तसेच इतर देश पाठिंबा देतील अशी आशा व्यक्त केली.

आठ वर्षे रक्त, घाम आणि अश्रू गाळल्यानंतर आरसीइपी कराराला मूर्त स्वरूप प्राप्त होण्याचा क्षण आला आहे. खडतर काळात बचावात्मक उपाय अवलंबण्याऐवजी बाजारपेठ खुली करण्याचा संदेश या समूहातील देशांनी दिला आहे.
- महंमद अझ्मीन अली, मलेशियाचे व्यापार मंत्री

संबंधित बातम्या