संसदेचे पावसाळी अधिवेशन गुंडाळणार?

प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना संकटाने संसद भवन आणि लोकप्रतिनिधींनाही विळखा घातल्यामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन एक आठवडा आधीच (गुरुवारपर्यंत) गुंडाळले जाण्याची शक्यता आहे.

देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना संकटाने संसद भवन आणि लोकप्रतिनिधींनाही विळखा घातल्यामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन एक आठवडा आधीच (गुरुवारपर्यंत) गुंडाळले जाण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या कामकाज विषयक समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये सत्ताधारी भाजपसह सर्व पक्षांनी अधिवेशन लवकर संपविण्यावर सहमती दर्शविल्याचे समजते. अर्थात, याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाची संसदीय कामकाज विषयक समिती करेल. 

१४ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप वेळापत्रकानुसार १ ऑक्टोबरला होईल. मात्र कोरोनामुळे चिंता वाढली आहे. अधिवेशनाच्या प्रारंभीच खासदारांची  कोरोना चाचणी होऊन त्यात दोन्ही सभागृहातील मिळून २५ खासदार कोरोना संक्रमित झाल्याचे आढळून आले. तर नितीन गडकरी आणि प्रल्हाद पटेल हे केंद्रीयमंत्री देखील कोरोनाग्रस्त झाले आहेत.  

असे असताना, अवघ्या आठवडाभरात लोकसभेतील एक आणि राज्यसभेतील एक अशा दोन विद्यमान खासदारांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवल्यानंतर चिंता वाढली वाढली. कोरोना संक्रमण टाळण्यासाठी संसद भवन परिसरात व सभागृहातही सुरक्षित अंतर राखण्याच्या सर्व प्रकारच्या उपाययोजना करूनही दिवसेंदिवस होणाऱ्या गंभीर परिस्थितीत संसदेचे अधिवेशन फेरविचार केला जावा, अशी मागणी पुढे आली. 

 त्यापार्श्वभूमीवर लोकसभेच्या कामकाज विषयक समितीची बैठक झाली. एवढेच नव्हे तर कोरोना संकट नियंत्रणात आल्यास गरजेनुसार महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी महिनाभरानंतर छोटेखाने अधिवेशन घेतले जाऊ शकते, असा प्रस्ताव या बैठकीत पुढे आल्याचेही समजते

संबंधित बातम्या