Petrol-Diesel दर वाढणार का? पहा पेट्रोलियम मंत्री काय म्हणाले...

जर TMC सरकारने किंमतीत 3.51 रुपयांची वाढ केली नसती, तर ती अजून 100 रुपये प्रति लिटरच्या खाली असते.
पेट्रोल डिझेल
पेट्रोल डिझेलDainik Gomantak

कोलकाता: राज्यांना GST च्या कक्षेत इंधनाचे दर आणायचे नाहीत यामुळे देशातील पेट्रोलचे दर कमी होत नाहीत, असे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केले. PTI च्या मुलाखतीत हरदीप सिंह पुरी म्हणाले की, TMC सरकार जबरदस्त कर लावत असल्याने पश्चिम बंगालमध्ये पेट्रोलच्या किंमतींनी 100 रुपयांचा टप्पा ओलांडला जात आहे.

जर सामान्य नागरिकांना पेट्रोलच्या किंमती खाली याव्यात असे वाटत असेल तर त्याचे उत्तर नेहमीच होय असेल. आणि जर पेट्रोलचे दर का कमी होत नाहीत, तर त्याचे उत्तर हे आहे की राज्यांना ते दर GST अंतर्गत कमी करायचे नाहीत. असे ते म्हणाले.

इंधनाचे दर जीएसटी अंतर्गत आणण्याची आता योग्य वेळ नाही: निर्मला सीतारामन

केंद्राकडून 32 रुपये प्रति लीटर पेट्रोलवरील कर म्हणून आकारले जाते. इंधनाची किंमत 19 डॉलर प्रति बॅरल असताना 32 रुपये प्रति लिटरचे दर आकारले आणि किंमत 75 डॉलर प्रति बॅरल झाली तरीही तेच दर आकारले जात आहेत. हे 32 रुपये प्रति लीटर, यामध्ये लोकांना मोफत रेशन, मोफत घरे आणि उज्ज्वला प्रदान अश्या अनेक योजना सरकारकडून राबवल्या जात आहेत, असेही ते म्हणाले.

पेट्रोल डिझेल
तूर्तास पेट्रोल डिझेल जीएसटी कक्षेच्या बाहेर

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले:

पश्चिम बंगाल(West Bengal) सरकारने जुलैमध्ये किंमतीत 3.51 रुपयांची वाढ केली, परिणामी पेट्रोल शतकाचा टप्पा ओलांडले. एकत्रित करप्रणाली पश्चिम बंगालमध्ये सुमारे 40 टक्के आहे. स्टेटमेंट करणे खूप सोपे आहे. जर टीएमसी सरकारने किंमतीत 3.51 रुपयांची वाढ केली नसती, तर ती अजून 100 रुपये प्रति लिटरच्या खाली असते, असे ते म्हणाले.

भबानीपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पुरी बुधवारी कोलकातामध्ये आले होते. ज्यात मुख्यमंत्री (CM)ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)भाजपच्या (BJP)प्रियंका तिब्रेवाल (Priyanka Tibrewal)आणि श्रीजीब बिस्वास(Shreejib Biswas) यांच्या विरोधात टीएमसीच्या उमेदवार म्हणून निवडकुन लढवणार आहेत.

संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ (State Cabinet)याचा प्रचार का करत आहे? विजयाबद्दल आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे, आणि मतदाना नंतरची हिंसा हा या मतदानातील एक प्रमुख मुद्दा आहे, असा दावा त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com