संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी लोकसभा सचिवालय सज्ज आहे काय?

दैनिक गोमंतक
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

मात्र देशभरात कोरोनाचा कहर चालू असल्याने सध्याच्या काळात संसदेचे हिवाळी अधिवेशन आता होणार नाही, अशी दाट चिन्हे आहेत.

नवी दिल्ली: यंदाचे हिवाळी अधिवेशन घेण्यास संसदेच्या म्हणजेच लोकसभेच्या सचिवालयाची पूर्ण सज्जता आहे ,असे ओम बिर्ला यांनी नुकतेच पत्रकारांना सांगितले होते. मात्र देशभरात कोरोनाचा कहर चालू असल्याने सध्याच्या काळात संसदेचे हिवाळी अधिवेशन आता होणार नाही, अशी दाट चिन्हे आहेत. त्यामुळे आता प्रजासत्ताकदिनानंतर (बहुधा २८ वा २९ जानेवारी २०२१ पासून) थेट अर्थसंकल्पी अधिवेशनाला जोडूनच हिवाळी अधिवेशनही घेतले जाण्याची दाट शक्‍यता आहे. 

सप्टेंबरमध्ये पावसाळी अधिवेशनात शेकडो संसदीय कर्मचारीही कोरोना संक्रमित आढळले होते. त्यामुळे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक खासदारांनी हिवाळी अधिवेशन रद्द करण्यास अनुकूलता दर्शविली होती. कोरोनावरील लस न आल्यास हिवाळी अधिवेशन बोलावून संसद सदस्य, त्यांचे कर्मचारी व सचिवालय कर्मचारी आदींचे जीव धोक्‍यात घालू नये, अशी मागणी अनेक खासदारांकडून आली होती.

संबंधित बातम्या