'अभिनंदन' वर्धमान; बालाकोटच्या हिरोचा होणार 'वीर' चक्राने सन्मान

अभिनंदन यांच्या व्यतिरिक्त, सॅपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आला आहे .
 Wing Commander Abhinandan Varthaman accorded the Vir Chakra by President Ram Nath Kovind
Wing Commander Abhinandan Varthaman accorded the Vir Chakra by President Ram Nath Kovind Dainik Gomantak

हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) यांना आज 'वीर चक्र' (Vir Chakra)प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना या सन्मानाने सन्मानित करण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती, मात्र आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind ) त्यांना हा सन्मान प्रदान करणार आहेत. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर (Balakot Air Strike) विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे F-16 विमान खाली पाडले होते. (Wing Commander Abhinandan Varthaman accorded the Vir Chakra by President Ram Nath Kovind)

14 फेब्रुवारी 2019 रोजी, पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने पुलवामा येथे CRPF च्या ताफ्यावर फिदाईन हल्ला केला. या हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले होते.या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26-27 फेब्रुवारीच्या रात्री पाकिस्तानातील बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला. भारताच्या या हवाई हल्ल्यात पाकिस्तानात बसलेले 300 हून अधिक दहशतवादी मारले गेले होते.

27 फेब्रुवारी रोजी, हवाई हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतात घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय हवाई दलाने त्यांना हाकलून लावले. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन मिग-21 उडवत होते. त्याच विमानातून त्यांनी पाकिस्तानचे F-16 पाडले. मात्र, नंतर अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले, त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने त्यांना ताब्यात घेतले. भारताच्या दबावाखाली पाकिस्तानने सुमारे 60 तासांनंतर अभिनंदन यांची सुटका केली होती.

 Wing Commander Abhinandan Varthaman accorded the Vir Chakra by President Ram Nath Kovind
पंजांबाच्या पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पवर ग्रेनेड हल्ला

अभिनंदन यांनी मिग-21 वरून F-16 ला पडले होते . त्यामुळे त्यांचे जगभरातून कौतुक झाले. याचे कारण F-16 हे अत्यंत प्रगत लढाऊ विमान होते, जे अमेरिकेने बनवले होते. तर मिग-21 हे 60 वर्ष जुने रशियन बनावटीचे विमान होते. भारताने 1970 च्या दशकात रशियाकडून मिग-21 खरेदी केले होते.आणि या कामगिरीमुळेच विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना आज 'वीर चक्र' प्रदान करण्यात येणार आहे.

अभिनंदन यांच्या व्यतिरिक्त, सॅपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आला आहे . जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केलेल्या कारवाईत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्याचवेळी मेजर विभूती शंकर धुंडियाल यांनाही मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. पाच दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी आणि 200 किलो स्फोटके जप्त करण्याच्या कारवाईतील भूमिकेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com