वीप्रो आपल्या कर्मचाऱ्यांना देणार 1 लाख लसीचे डोस

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 21 मे 2021

बेंगळूर स्थित माहिती तंत्रज्ञान कंपनी विप्रोने (Wipro) त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी 1 लाख डोस मिळण्याची विनंती केली आहे. तसेच डोस मिळाल्यास येत्या जून महिन्याच्या सुरुवातीलाच  कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण (Vaccination) मोहिम सुरु केली जाईल, असं विप्रोकडून सांगण्यात आलं आहे.

बेंगळुरु : बेंगळूर स्थित माहिती तंत्रज्ञान कंपनी विप्रोने (Wipro) त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी 1 लाख डोस मिळण्याची विनंती केली आहे. तसेच डोस मिळाल्यास येत्या जून महिन्याच्या सुरुवातीलाच  कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण (Vaccination) मोहिम सुरु केली जाईल, असं विप्रोकडून सांगण्यात आलं आहे.  कंपनीच्या भारतातील (India) कर्मचाऱ्यांना कोविड 19 (covid-19)प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी  कंपनीने  रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य  केंद्रांसमवेत ऑनलाइन टू ऑफलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्म पार्टनरशिप केली आहे. (Wipro will give 1 lakh vaccine doses to its employees) 

Monsoon: मान्सून 27 मे ला केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता

कंपनीने  कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी कोवीशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीची मागणी केली आहे.  लसी मिळाल्यानंतर कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून कुटुंबियांसाठी पहिल्या टप्प्यात तीन लशींचे एकूण 1 लाख डोस मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.  विप्रो लसीकरण सेवा मोफत देण्यात येणार आहे. देशभरातील एकूण  21 शहरांमध्ये 140 सेंटर्सच्या माध्यमातून  कंपनीच्या कॅम्पस आणि पार्टनर असलेल्या रुग्णालयांकडून लसीकरण मोहिम राबवली जाणार असल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

1100 वर्षांपूर्वींच्या मंदीरातील रुग्णालयाची कहाणी; इथं सर्जरीही केली जायची

विप्रोचे 1.9 लाख कर्मचारी आहेत. लसीकरण सेवा विनामूल्य पुरविली जातील आणि त्याचे आयोजन त्याच्या कॅम्पस आणि देशभरातील भागीदार रुग्णालयात दोन्हीद्वारे केले जाईल. टेक महिंद्राचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सी. गुरानी यांनी याबाबत माहिती दिली आहे.  लसीकरणांसाठी कंपनी टास्कफोर्स आपल्या कंपन्यांतील कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लस देण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी परदेशातील फार्मा कंपन्यांशी चर्चा करीत आहे.  विशेष म्हणजे आता लसीकरनाबाबत कायदाही थोडा अनुकूल झाला आहे. त्यामुळे कंपनी टास्कफोर्सच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याचेही गुराणी यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या