प्राइव्हसी पॉलिसी मागे घ्या, अन्यथा कडक कारवाई करु - सरकारचा व्हाट्सएपला इशारा

दैनिक गोमंतक
बुधवार, 19 मे 2021

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने व्हाट्सएपला आपली नवीन पॉलिसी मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचे एक पत्र देखील माहिती आणि प्रसारणमंत्रालयाकडून व्हाट्सएपला देण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : व्हाट्सएपच्या (Whatsapp) नव्या पॉलिसीवरुन सुरु झालेला वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत, व्हाट्सएपने आपली नवीन प्राइव्हसी पॉलिसी (Privacy Policy) भारतासह अनेक देशात लागू केली आहे. परंतु या पॉलिसीवरुन पाच महीने वाद सुरु आहे, या पॉलिसीबाबत दिल्ली हायकोर्टाने (delhi high court) केंद्र सरकार (Central Government) आणि व्हाट्सएप ((Whatsapp) यांना उत्तर मागितले होते. अशातच आता सरकारी सूत्रांकडून मिळलेल्या माहिती नुसार, जर व्हाट्सएपनी आपली पॉलिसी मागे घेतली नाही तर सरकार व्हाट्सएपवर कडक कारवाई करु शकते असा इशारा व्हाट्सएपला देण्यात आला आहे.

'WhatsApp' ला फटका; प्रायव्हसी पॉलिसीतील बदल भोवला

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने व्हाट्सएपला आपली नवीन पॉलिसी मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचे एक पत्र देखील माहिती आणि प्रसारणमंत्रालयाकडून व्हाट्सएपला देण्यात आले आहे. 

ही पॉलिसी भारतीय व्हाट्सएप यूझरर्सचा डाटा सुरक्षित धोक्यात आणणारी आहे. आज करोडो भारतीय यूझरर्स संभाषणासाठी व्हाट्सएपचा वापर करतात. पण व्हाट्सएपच्या नवी पॉलिसी लागू करुन आपली जबाबदारी झटकण्याचे काम केले आहे. व्हाट्सएपच्या नवीन पॉलिसीबाबत दिल्ली हायकोर्टात केस सुरु आहे. ही पॉलिसी भारतातील अनेक कायद्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे व्हाट्सएपने याबाबात 7 दिवसांत स्पष्टीकरण द्यावे, त्यांच्याकडून समाधान कारक उत्तर न मिळाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. 

संबंधित बातम्या