पीठाच्या गिरणीत केस अडकून महिलेचा मृत्यू

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

धान्य दळून देणाऱ्या गिरणीवर पीठ दळून देतांना एक धक्कादायक घटना धडली आहे. गिरणीवर काम करत असताना एका महिलेचा अपघात झाला आणि या अपघातात त्या महिलेचा शिरच्छेद झाल्याची घटना पंजाबमध्ये घडली आहे.

पंजाब: धान्य दळून देणाऱ्या गिरणीवर पीठ दळून देतांना एक धक्कादायक घटना धडली आहे. गिरणीवर काम करत असताना एका महिलेचा अपघात झाला आणि या अपघातात त्या महिलेचा शिरच्छेद झाल्याची घटना पंजाबमध्ये घडली आहे. गिरणीवरील मशीनमध्ये त्या महिलेचे केस अडकले आणि क्षणात तिचे शीर धडावेगळे झाले. बलजीत कौर असे मृत महिलेचे नाव असून ही दुर्देवी घटना पंजाबच्या फिरोझपूर जिल्ह्यामध्ये घडली आहे. आपल्या पती सोबत मिळून बलजीत कौर पीठाची गिरणी चालवात होत्या.

रशियावर नव्याने निर्बंध लादण्याबाबत युरोपीय महासंघ करणार चर्चा -

बलजीत कौर यांचे पती काही किरकोळ कामासाठी बाहेर गेले होते, त्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. एक ग्राहक दळण घेण्यासाठी म्हणून गिणीवर आला. बलजीत पीठ काढण्यासाठी आणि पीठ त्या ग्राहकाच्या डब्यात देण्यासाठी म्हणून मशीनच्या दिशेने खाली वाकल्या. त्यावेळी गिरणीची मशीन सुरु होती. अचानक त्यांचे केस गिरणीमध्ये अडकले आणि त्या अत्यंत वेगाने गिणीच्या मशीनमध्ये खेचल्या गेल्या. काही क्षणातच त्यांचे शीर धडापासून वेगळे झाले. ही पूर्ण घटना गिरणीव आलेल्या ग्राहकासमोर घडली.

मूळगावी नसतानाही आता करता येणार मतदान -

महिलेचा आवाज येताच रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांनी लगेच गिरणीच्या दिशेने धाव घेतली. बलजीत यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिचा जीव डॉक्टरही वाचवू शकले नाही. “बलजीत कौ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून कलम 174 अंतर्गत ही घटना नोंदवण्यात आली आहे” अशी माहिती जीरा पोलीस ठाण्याचे एएसआय बलविंदर सिंग यांनी दिली.

प्रजासत्ताक दिन 2021: वाळपई सत्तरीत भूमिपुत्रांचा हुंकार -

 

संबंधित बातम्या