विमानातच महिलेने दिला बाळाला जन्म; दोघांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी दिली माहिती

दैनिक गोमन्तक
बुधवार, 17 मार्च 2021

विमान प्रवासादरम्यान महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

विमान प्रवासादरम्यान महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बंगळुरू वरून जयपूरकडे जाणाऱ्या विमानाच्या उड्डाणादरम्यान महिलेने मुलीला जन्म दिला आहे. आज सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास बंगळुरू हुन जयपूरकडे जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या प्रवासावेळेस ही घडली. व त्यानंतर बाळ व आई सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. (Woman gave birth to the baby on the plane)      

विमान प्रवासाच्यावेळेस झालेल्या या प्रसूतीसाठी विमानातील केबिन क्रू आणि डॉक्टरांनी मदत केली असल्याची माहिती इंडिगोने स्वतः दिली. आज सकाळी बंगळुरूहुन जयपूरकडे जाणारे विमान क्रमांक 6 ई 469 मध्ये महिलेची प्रसूती झाली आणि या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला असल्याचे इंडिगोने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच आई आणि मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती इंडिगोने दिली आहे. (Indigo Baby)  

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका लसीला आता 'या' देशाने दिली स्थगिती  
  
(Woman gave birth to the baby on the plane) आज सकाळी इंडिगो एरलाईन्सचे विमानाणे नेहमी प्रमाणे उड्डाण घेतले आणि जयपूरकडे निघाले. मात्र उड्डाण घेऊन पुढे निघताच विमानातील एका महिलेला प्रसूती वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर केबिन क्रूला माहिती मिळताच तात्काळ विमानातील यंत्रणा कामाला लागली. आणि याच विमानातून प्रवास करणारे डॉक्टर सुबहान नजीर आणि विमानातील क्रूने महिलेच्या प्रसूतीसाठी मदत केली. दरम्यान महिलेवर पुढील उपचारांसाठी जयपूर विमानतळावर रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची टीम तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी बाळ व आईची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले आहे.   

संबंधित बातम्या